Кабинет

Посты канала ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

сначала новые

#37301Текст

ती परी वाटते... 🥹❤️😇       स्वतःचे स्वप्न स्वाभिमानाने बाळगताना आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः धडपड करताना मी तिला रोज पाहतोय... पैसे कमी असेलही कदाचित, सौंदर्याची ठेवणं जरा कमीच म्हणते, कोणापुढे कधी हात पसरवत नाही😌 ना कोणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून पैसे घेऊन मज्जा करत नाही... अंथरून पाहून पाय पसराव हीच तिच्या आईची शिकवण आहे म्हणून दुकानात गेल्यावर सुंदर नाही तर ती  वस्तू कितीला पडेल याचा जास्त विचार करते...😌 असलं नसलं कोणी आयुष्यात तिच्या तीच ती बिनधास्त जगते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी ती कधी कधी छोट्या गोष्टींचही खूप टेन्शन घेते... 😅 सगळं काही सगळयांचा ऐकून घेते, समजदारीने ती प्रत्येक वेळेस वागते, चुकी असेल तर पायाही पडेल ओ पण चुकी नसताना नजरही खाली न करता बोलण्यास तुटून पडते... ☺️ आईवडिलांच्या अपेक्षा, स्वतःचे स्वप्न, भावंडचे भविष्य, असलेली परिस्तिथी आणि "एक दिवस सगळं काही ठीक होईल" ह्या आशेवर रोज नव्या परिस्तिथी ला तोंड देणारी ती... कधी कधी माझा राग, समस्या, टेन्शन ऐकून खांद्यावर हात ठेवून "होईल रे सगळं नको काळजी करू म्हणून मला धीर देते"... ☺️ खरंतर तिच्याकडे खूप मार्ग होते काहीही न करता सगळं काही मिळवण्याचे पण तिने निवडला तिचा स्वाभिमान, तिचा आत्मसन्मान, योग्य मार्गाने केली जाणारी मेहनत, स्वावलंबीपणा आणि यामुळेच ती मला परी वाटते माझ्या आयुष्यातली माझ्या आईंनंतर मला ती एक स्वाभिमानी स्त्री वाटते...😇❤️ (लिहिलेला लेख पूर्णपणे काल्पनिक पण सत्य घटनेवर आधारित आहे कृपया लेखिकेच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करू नये... 🙏)               ✍प्रियंका भोसले...✍

Открыть в Telegram
Просмотры511−59%к среднему
Пересылки—
Реакции12
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
3 ч483
6 ч511
  1. Через 6 часов511
  2. Всего сейчас511
#37300Текст

‘डी-लिमिटेशन’ अर्थात राजकारणातील ‘कुटुंब नियोजन’ ते ‘संयुक्त कुटुंब’ योजना! आपल्या देशात सामान्य माणसाला काही अवघड इंग्रजी शब्द समजायला जरा वेळच लागतो. त्यातलाच एक सध्या गाजणारा आणि भल्याभल्यांना बुचकळ्यात पाडणारा शब्द म्हणजे ‘डी-लिमिटेशन’ अर्थात मतदारसंघ पुनर्रचना. राज्यशास्त्राच्या पुस्तकात या शब्दाची व्याख्या काहीही असो, पण आपल्याकडच्या अस्सल राजकीय अभ्यासकांनी आणि सोशल मीडियावरील ‘व्हायरल विद्यापीठाने’ या संकल्पनेचा अगदी सोपा, सुटसुटीत आणि थेट काळजाला भिडणारा अर्थ शोधून काढला आहे. तो अर्थ म्हणजे— एकाच घरात सत्तेची जास्तीत जास्त ‘बियाणे’ पेरण्याची सुवर्णसंधी! पूर्वीचे ‘आटोपशीर राजकीय कुटुंब’ पूर्वीच्या काळी, म्हणजेच ‘डी-लिमिटेशन’च्या अगोदर, राजकीय घराण्यांची अवस्था मोठी केविलवाणी असायची हो! बिचाऱ्या नेत्यांना मतदारसंघांची संख्या मर्यादित असल्यामुळे आपल्याच घरातल्या लोकांवर मोठा अन्याय करावा लागायचा. घरात इच्छुक उमेदवारांची रांग लागलेली असायची, पण तिकिटे मात्र मोजकीच असायची. त्यामुळे नाइलाजाने तडजोड करावी लागे. त्या काळातलं एक आदर्श राजकीय कुटुंब कसं दिसायचं? तर ‘साहेब’ स्वतः खासदार असायचे, लाडकी ‘मुलगी’ दुसऱ्या मतदारसंघातून खासदार असायची आणि धाकटा ‘मुलगा’ राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून जनतेची सेवा करत असायचा. बास! एवढ्यावरच त्या बिचाऱ्या कुटुंबाला समाधान मानावं लागायचं. यालाच त्या काळी ‘मर्यादित लोकशाही’ किंवा ‘आटोपशीर राजकीय कुटुंब’ म्हणत असावेत. घरातील ‘जनसेवकांची’ अस्वस्थता पण या मर्यादित जागांमुळे घरातल्या इतर सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ लागली. “साहेब, आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायला आणि निवडणुकीत बुथवर बसायला जन्माला आलो आहोत का?” असा रास्त सवाल घरातील तरुण पिढी विचारू लागली. बायकोचा तर वेगळाच सूर असायचा— “मी घरातले सगळे प्रश्न सोडवते, मग संसदेतले प्रश्न सोडवायला मला का पाठवत नाही?” तिकडे पुतण्या आणि पुतणीही काकांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘जनसेवेसाठी’ गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. नातवाचं तर कॉलेज संपत आलं होतं, त्यालाही आता ‘युवा नेता’ म्हणून मिरवण्याची भारी हौस होती. एकूणच, एकाच वाड्यात इतके ‘जनसेवक’ तयार झाले होते की, त्यांना सामावून घ्यायला भूगोल अपुरा पडू लागला होता. अशा या ऐतिहासिक आणि भावनिक पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठीच जणू ‘डी-लिमिटेशन’चा अवतार झाला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये! डी-लिमिटेशननंतरची नवीन राजकीय रचना आता बघा ना, डी-लिमिटेशननंतर या राजकीय घराण्यांचं चित्र कसं पालटणार आहे. मतदारसंघांची संख्या वाढणार, सीमा बदलणार आणि नव्या जागा निर्माण होणार. याचा थेट फायदा ‘हम दो, हमारे दो’वरून थेट ‘हम सब, और सबके सब’ या नव्या राजकीय धोरणाला होणार आहे. डी-लिमिटेशननंतरच्या आदर्श राजकीय कुटुंबाची रचना काहीशी अशी असेल: साहेब तर खासदार राहतीलच, पण त्यांच्या शेजारच्या मतदारसंघातून आता ‘बायको’ही खासदार म्हणून निवडून येईल. मुलगी खासदार राहीलच, मुलगा आमदार राहीलच; शिवाय आता 'पुतणी' खासदार होईल आणि 'पुतण्या' आमदारकीची माळ गळ्यात घालेल. इतकंच काय, तर आजी-आजोबांच्या पुण्याईने 'नातू'सुद्धा थेट खासदारकीच्या रिंगणात उतरून विजयी होईल! खऱ्या अर्थाने ‘परिवार का विकास’ याला म्हणतात खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, परिवार का विकास’! यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, आता संसदेत किंवा विधानसभेत कोणत्याही विषयावर चर्चा करताना गोंधळ होणार नाही. कारण सत्ताधारी बाकावरही आपलाच माणूस असेल आणि विरोधी बाकावरही चुलत किंवा मामेभाऊच बसलेला असेल. अधिवेशनाच्या काळात वेगवेगळ्या हॉटेलात राहण्याचा खर्च वाचेल; सगळे खासदार आणि आमदार एकाच वाड्यात रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर बसून देशाचे आणि राज्याचे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतील. ‘खासदार निधी’ आणि ‘आमदार निधी’ यांचा एकत्रित निधी थेट एकाच कौटुंबिक ट्रस्टच्या माध्यमातून ‘जनतेच्या’ कल्याणासाठी वापरता येईल. थोडक्यात काय, तर सामान्य माणसासाठी ‘डी-लिमिटेशन’ म्हणजे फक्त मतदारसंघाच्या नकाशावरच्या रेषा बदलणे असेल; पण राजकीय घराण्यांसाठी मात्र ती ‘एक घर, अनेक पदे’ ही महायोजना आहे. लोकशाही ही लोकांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली असते, हे आपण शाळेत शिकलो होतो. आता फक्त त्यात थोडी सुधारणा करून ‘एकाच घरातल्या लोकांनी, एकाच घरातल्या लोकांसाठी चालवलेली व्यवस्था’ अशी नवीन व्याख्या स्वीकारण्याची मानसिक तयारी आपण ठेवायला हवी! डॉ. रुपेशकुमार राऊत.( लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

Открыть в Telegram
Просмотры898−29%к среднему
Пересылки—
Реакции13
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
1 ч264
3 ч506
7 ч898
  1. Через 1 час264
  2. Через 6 часов898
  3. Всего сейчас898
#37299Фото
Просмотры829−34%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
1 ч250
3 ч495
7 ч829
  1. Через 1 час250
  2. Через 6 часов829
  3. Всего сейчас829
#37298Фото

एक महत्त्वाचा मुद्दा मी मिस केला काल, की इलेक्शन लढण्यासाठी पैसा लागतो.. जर इतके जास्त उमेदवार राहिले तर त्यांना सर्व जागांवर उभे करणे आणि त्यांचा इलेक्शन खर्च करण्याची क्षमता सध्या फक्त भाजपकडे आहे.. त्यामुळे इलेक्शन एकतर्फी होण्याची भीती खरी आहे. यांत सुप्रीम कोर्टाची पण चूक आहे, त्यांनी निर्णय दिला की इलेक्ट्रॉल बाँड संविधानाच्या विरुद्ध आहे, आणि ते पैसे तसेच राहू दिले पार्टींकडे. आता फार जास्त विषमता झाली आहे. याला पण शेवटी उत्तर हेच आहे की भारतीय जनतेने स्वतःला पैसे घेऊन मतदान करण्यासाठी विकू नये, तुम्ही मत नाही तर ही लोकशाही पैसेवाल्यांना विकत आहे. अनिकेत पाटील.

Открыть в Telegram
Просмотры782−38%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
3 ч357
5 ч611
7 ч782
  1. Через 6 часов611
  2. Всего сейчас782
#37297Фото
Просмотры711−44%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч136
6 ч711
  1. Через 1 час136
  2. Через 6 часов711
  3. Всего сейчас711
#37296Превью ссылки
Просмотры741−41%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
2 ч290
8 ч741
  1. Через 6 часов741
  2. Всего сейчас741
#37295Текст

पैसा कमवा, पण आयुष्य जगायलाही शिका! मित्र आणि मैत्रिणींनो… आयुष्यामध्ये पैसे कितीही कमवता येतात; पण एकदा गमावलेला जीव पुन्हा मिळवता येत नाही. पैसा कमावण्याच्या धावपळीत आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. दिवसरात्र मेहनत करून पैसा साठवतो; पण स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला विसरतो. आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहतो की, कालपर्यंत हसत-खेळत, चालत-फिरत असलेली व्यक्ती अचानक आपल्यातून निघून जाते. कधी हृदयविकाराचा झटका, तर कधी रक्तदाबातील गंभीर बदल किंवा इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे परिस्थिती अचानक गंभीर होऊ शकते. म्हणूनच वेळोवेळी आरोग्य तपासणी करा, योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि व्यायामासाठीही वेळ काढा. कारण पैशांसोबत थोडं आरोग्यही कमवायला शिका. शरीरासोबत मनाचीही काळजी घ्या. मनातल्या चिंता आणि अडचणी एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, जिच्याजवळ आपण मन मोकळं करू शकतो. मनाला शांतता आणि समाधान मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पैसा कमावण्याच्या धावपळीत आई-वडील, पत्नी, मुलं, मित्रमैत्रिणी आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना वेळ द्यायला विसरू नका. कारण पैसा पुन्हा कमावता येतो; पण आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण पुन्हा अनुभवता येत नाहीत. व्यसन माणसाचं आरोग्य, कुटुंब आणि भविष्य यावर गंभीर परिणाम करू शकतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दोन हात लांब राहा, ही नम्र विनंती. शक्य असेल तिथे गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी हात पुढे करा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण माणुसकीपेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीही नाही. आयुष्यामध्ये कधीही कोणाला कमी समजू नका. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, संघर्ष आणि जगण्याची पद्धत वेगळी असते. आज एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर उद्या ती यशस्वी होऊ शकते. त्यामुळे पैशावरून माणसाची किंमत ठरवू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. आपण अनेकदा एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर म्हणतो, "माणूस खूप चांगला होता!" पण मनात एक प्रश्न येतो, हेच कौतुकाचे शब्द त्या व्यक्तीच्या हयातीत का बोलले जात नाहीत? माणूस जिवंत असतानाच त्याचं कौतुक करा, त्याला प्रेम द्या, त्याचा आदर करा आणि आपुलकीने वागा. प्रत्येक नात्याला महत्त्व द्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. लहानसहान गोष्टी मनात साठवून ठेवू नका. विनाकारण राग, गैरसमज आणि अहंकार वाढवू नका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. ते द्वेषात आणि तक्रारींमध्ये घालवण्यापेक्षा प्रेमाने, हसत-खेळत आणि एकमेकांना समजून घेत जगा. या सर्व गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. आपले आवडते छंद जोपासा आणि स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. सतत जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आवडी-निवडी विसरू नका. आयुष्य कधी संपेल, याची खात्री कोणालाच देता येत नाही. त्यामुळे उद्याची चिंता करत आजचा आनंद गमावू नका. प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घ्या. स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं… पैसा कमवा, पण आरोग्य गमावू नका. शरीराची काळजी घ्या, मनाला शांत ठेवा, कुटुंबाला वेळ द्या, माणसं कमवा आणि नाती जपा. एकमेकांची किंमत जिवंत असतानाच करा. कोणालाही कमी समजू नका आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत राहा. कारण पैसा ही आयुष्याची गरज आहे; पण आरोग्य, प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि मनाचं समाधान हीच आयुष्याची खरी कमाई आहे! ✍️ लेखक : अनिल मुद्दे...

Открыть в Telegram
Просмотры1 280+2%к среднему
Пересылки—
Реакции6
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
14 ч734
25 ч1 280
  1. Через 24 часа1 280
  2. Всего сейчас1 280
#37294Фото
Просмотры1 070−15%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
14 ч706
25 ч1 070
  1. Через 24 часа1 070
  2. Всего сейчас1 070
#37293Текст
Просмотры1 010−20%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#37292Фото
Просмотры1 270+1%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#37291Фото

26 nov च्या रात्री छ.शिवाजी रेल्वेस्थानक,ताज हॉटेल,ओबेरॉय अशा गर्दीच्या ठिकाणी पडला होता गोळ्यांचा पाऊस.. रक्ताच्या सडायाने रंगून गेले होते कामा रुग्णालय,कॅफे व नरिमन हाऊस..! फक्त दहा मिश्या फुटलेल्या अतिरेक्यांनी माजवला होता मुंबईत एवढा हाहाकार.. सुरवातीला पोलीस,स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले परिस्थिती नियंत्रणाचे पन सर्व झाले लाचार..! शेवटी अतिरेक्यांना पकडण्यासाठी व नागरिकांना सोडविण्यासाठी आणले होते NSG कमांडो आणि राबवले ऑपरेशन.. परंतु दुर्दैवाने शत्रूशी लडता लडता ह्यात धारातीर्थ पडले मेजर संदीप उन्नीकृष्णन..! अतिरेक्यांना पकडताना कामटे,करकरे,साळसकर,तुकाराम ओंबळे सर असे अनेक अधिकारी शहीद झाले भारतमातेचे पुत्र.. शेवटी कसाबला गिरगाव चौपाटी जवळ पकडण्यात यश आले जेव्हा पोलिसांनी घेतले हातात सूत्र..! ह्या हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप स्वदेशी व विदेशी नागरिकांच्या तसेच देशासाठी गतप्राण झालेल्या पोलीस,अधिकारी सर्वांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन व श्रध्दांजली🙏🇮🇳जय हिंद ......🦋🌺🇮🇳✍..... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

Открыть в Telegram
Просмотры1 180−6%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#37290Текст

Adjust...😇😌 माणूस म्हणतो आयुष्यात adjust करता आलच पाहिजे मग ते कुठल्याही गोष्टीत असो तडजोड(Adjust) ही जमलीच पाहिजे पण प्रत्येक वेळी आपण तडजोड करतो, समजून घेतो म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याकडनेच अपेक्षा ठेवल्या जातात कि ती व्यक्ती प्रत्येक वेळेस समजून घेते म्हणजे ह्याही वेळेस समजून घेईल adjust करेल पण खरंतर असं नसतं कुठल्याही व्यक्तीच्या काही मर्यादा असतात ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या एकदा का त्या मर्यादा संपल्या कि कोणतीच व्यक्ती adjust करू शकत नाही किंवा ती व्यक्ती काही समजून घेण्याच्या मनस्थिती नसते... मुळात म्हणजे प्रत्येकालाच adjust करता आलंच पाहिजे समोरचा करतोय म्हणजे दरवेळी तोच करेल ही अपेक्षाच का ठेवावी मुळात? आणि आपण आयुष्य जगत असताना आपण कुठं चुकतोय हे आपल्याला माहित असत म्हणून आपण वागताना आपल्या वागण्याचा कोणाला त्रास तर होत नाहीये ना, आपल्यामुळे कोणाला adjust तर करावं लागत नाही ना ह्याचा प्रत्येकानी नेहमी विचार करावा असं मला वाटत...😌☺️ आणि आपली व्यक्ती आहे म्हणून adjust करण आलच पण आपल्या adjust करण्याचा कोणी गैरफायदा तर घेत नाहीये ना हेही आपल्याला कळायला हवंच ना...😌😇 ✍प्रियंका भोसले...✍

Открыть в Telegram
Просмотры1 060−16%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#37289Текст

भारतीय संविधान.. एक सर्वोत्तम कलाकृती... 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विशेष लेख.. ✍️"कोणतीही कलाकृती बनवणं सोपं नसतं मित्रांनो,त्यामागे कलाकारांचे कष्ट,मेहनत, आणि त्याग असतो. भारतीय संविधान ही जगातील एक सर्वश्रेष्ठ कलाकृतीपैकी एक आहे.ही एका दिवसात तयार झाली नाही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस यासाठी लागले.मूळ संविधानामध्ये 395 कलमे व 8 परिशिष्ट व 22 भाग होते तर सध्या वर्ष 2026 मध्ये वर्तमान संविधानामध्ये 25 भाग,12परिशिस्ट व 450 च्या वर कलमे आहेत.आतापर्यंत जवळपास 130 घटनादुरुस्त्या झाल्या आहे.. 'भारतीय संविधान' हा प्रत्येक भारतीय माणसाच्या मूलभूत अधिकाराचा जाहीरनामा आहे.शिक्षण, नागरिकत्व, भाषण स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, निवास स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानता याबरोबर बालक, स्त्री, वृद्ध, दिव्यांग या प्रत्येक व्यक्तीला संविधानाने मूलभूत अधिकार मिळवून दिले...राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री, आयएस आयपीएस यांच संविधानाला स्मरून शपथ घेतं असतात. संविधान हे एक साधारण पुस्तकं नसून,ह्यावर अख्खा देश चालतो.जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि हे जगातलं सर्वात मोठं संविधान आहे आणि ह्या संविधानाचे शिल्पकार आहेतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस आजच्याच दिवशी हे संविधान संपूर्ण अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आलं...संविधानाने सर्वसामान्य माणसाला राजा बनण्याचा अधिकार दिला,व सत्ता लोकांच्या हाती दिली. " लोकांचे,लोकांसाठी,लोकांडून चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय." ही लोकशाही 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली.खरं तर मित्रांनो भारतीय संविधान म्हणजे आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे.. हे असं पुस्तकं आहे कीं ज्यावर संपूर्ण देश चालतो.. भारताच पानं सुद्धा या पुस्तकाशिवाय हालत नाही...पण आजही खूप मोठी शोकांतिका आहे कीं लोकं संविधान वाचत नाही.. शाळा कॉलेजच्या अभ्यासात संविधान आहे,पण आजकाल मुलं पुस्तकं फक्त परीक्षा पास होण्यापुरतं पुस्तकं वाचतात.. आजही आपल्यासाठी संविधानातं कायं तरतूद आहे..? हे बहुतांश लोकांना माहित नाही.. युपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी सुद्धा याकडे फक्त एक अभ्यासक्रम म्हणून पाहतात.. खरं तर मित्रानो भारतीय संविधान हा केवळ एक ग्रंथ नाही.. तर ती प्रत्येक भारतीय माणसाची आचारसंहिता आहे.. ते प्रत्येक भारतीय माणसासाठी नितीशास्त्र आहे..डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील तो एक आदर्श आंबेडकरवाद आहे.. जो काळ आणि परिस्थितीनुसार स्वतः मध्ये योग्य परिवर्तन करतं असतो.. भारतीय संविधानातील कलम 368 म्हणजे आदर्श आंबेडकरवाद होय.. जो कठोर नसून लवचिक आहे.. परिस्थिती नुसार आपल्यामध्ये योग्य बदल करवून घेणारा हा सुंदर विचार आहे.. 25 नोव्हेंबर 1949 ला झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात... "मै यहाँ संविधान कीं अच्छाइ को किनारे तक नहीं लाऊंगा! क्यों कीं मुझे लगता है.! ये संविधान कितना बुरा क्यों ना!वो अंतत :अच्छा साबीत होगा! अगर इसे इस्तमाल मे लाने वाले लोग अच्छे होगे..! और ये संविधान कितनाही अच्छा क्यों ना हो!ये अंतत: बुरा साबित होगा! अगर इसे इस्तमाल मे लाने वाले लोग बुरे होंगे..! इसलिये जनता और उनके राजनीतिक दलो कीं भूमिका को संदर्भ लाये बीना..! संविधानपर क्योंइ भी टिप्पणी करना मेरे विचार मे व्यर्थ है..!" त्यामुळे हे संविधान अमलात आणाणारे जर चांगले असतील तर, नक्कीच लोकंराज्य स्थापन होईल..पण हे लोकराज्य स्थापन होण्यासाठी जनता जागरूक असली पाहिजे.. जनतेला आपले हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या माहित असल्या पाहिजे.. तरच खऱ्या अर्थाने क्रांती होईल... म्हणून प्रत्येक व्यक्तीने संविधानाचा अभ्यास करणं काळाची गरज आहे..प्रत्येक हातात मोबाईल पोहोचला पण प्रत्येक हातात संविधान पोहोचल नाही.. त्यामुळे ते पोहोचवण आवश्यक आहे..तेव्हाच खरी लोकशाही समजेल. 26 नोव्हेंबर 2026ला ह्या संविधानाला 77 वर्ष पूर्ण होतं आहे.. संविधान दिनानिमित्त प्रत्येक घरी संविधान असलं पाहिजे हा संकल्प करू या..! या दिवसानिमित्त सर्व संविधान निर्मात्यांना विनम्र अभिवादन... व समस्त देशवाशीयांना मनपुर्वक शुभेच्छा...यासोबत 26/11च्या हल्ल्यातील शहीदानाही मानवंदना...!” ✍️अनिल भगवान चव्हाण (ABC ) ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त लेखक, कवी, शिक्षक ) संपर्क -8806379959

Открыть в Telegram
Просмотры1 150−9%к среднему
Пересылки—
Реакции6
Комментарии—
#37287Фото
Просмотры1 490+18%к среднему
Пересылки—
Реакции24
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
46 ч1 250
69 ч1 490
  1. Всего сейчас1 490
#37286Видео

परवा २ न्यूज पाहिल्या अफगाणिस्तानमध्ये मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण बंद झाले, आणि इराण मध्ये परस्तू अहमदी ह्या गायिकेने हिजाब घातला नाही म्हणून ७४ चाबकाचे फटके मारण्यात आले.. आज ऑस्ट्रेलियातील संसद मधील हा व्हिडिओ पाहिला.. यात एक महिला खासदार तिची ड्यूटी करत आहे तर तिच्या बाळा बरोबर खेळून मागील महिला मदत करत आहे.. महिलांचे अधिकार हे पूर्णपणे भूगोलावर अवलंबून आहे.. डेन्मार्क, स्वीडन मध्ये जन्म झाला तर स्वर्ग.. अफगाणिस्तान, इराण मध्ये झाला तर नरक.. त्यामुळे एखादी महिला पुढे जात असेल तर दुसऱ्या महिलांनी जिथे जमेल तिथे मदत करत राहायला पाहिजे.. मायनॉरिटीचे अधिकार हे समूहात वाढत असतात, त्यांना वैयक्तिक वादामध्ये वाया घालवू नये.. अनिकेत पाटील.

Открыть в Telegram
Просмотры1 590+26%к среднему
Пересылки—
Реакции28
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
58 ч1 510
66 ч1 590
  1. Всего сейчас1 590
#37285Фото
Просмотры1 550+23%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
59 ч1 480
67 ч1 550
  1. Всего сейчас1 550
#37282Текст

टॅटू... आधुनिकतेची आवड की बदलती विचारसरणी? आजकाल टॅटू काढण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पूर्वी प्रामुख्याने मुलांमध्ये दिसणारी ही आवड आता मुलींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, नावे किंवा चिन्हे कायमस्वरूपी कोरून घेण्याची जणू फॅशनच झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा अधिकार आहे. टॅटू काढणे हीदेखील वैयक्तिक आवड असू शकते. मात्र कोणतीही फॅशन स्वीकारताना तिच्यामागचा विचार आणि त्याचे परिणाम समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज मुलांप्रमाणेच मुलीही टॅटू काढण्यासाठी दुकानांमध्ये जात आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर, अगदी खासगी भागांवरही टॅटू काढून घेतले जातात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही रील्समध्ये शरीराच्या अतिशय वैयक्तिक भागांवर टॅटू काढतानाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. यामध्ये आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे काही टॅटू शॉपचे मालक टॅटू काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच व्हिडिओ बनवतात आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. विशेषतः शरीराच्या वैयक्तिक भागांवरील टॅटूचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना संबंधित व्यक्तीची स्पष्ट संमती घेतली आहे का? तिच्या गोपनीयतेचा आदर केला आहे का? तिच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला आहे का? हे प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे. प्रसिद्धी, व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात एखाद्याच्या खासगीपणाशी तडजोड होऊ नये. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे व्हिडिओ केवळ मोठी माणसेच पाहतात असे नाही. आज लहान मुलेसुद्धा मोबाईलवर इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स पाहतात. अशा वेळी त्यांच्या वयाला न शोभणारे व्हिडिओ त्यांच्या समोर येऊ शकतात. अशा दृश्यांचा त्यांच्या मनावर, विचारांवर आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करायला नको का? एखाद्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतील, किती लाईक्स येतील यापेक्षा तो व्हिडिओ समाजासमोर प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, याची जाणीव असणे अधिक महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर काहीही प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपली संस्कृती काय आहे, आपली परंपरा काय आहे आणि आपण आधुनिकतेच्या नावाखाली नेमके काय स्वीकारत आहोत, याचाही विचार आजच्या तरुण पिढीने करायला हवा. काळानुसार बदल होणे स्वाभाविक आहे; मात्र बदल स्वीकारताना विवेक, संस्कार आणि वैयक्तिक मर्यादा जपणेही तितकेच आवश्यक आहे. टॅटू काढणे चुकीचे आहे की बरोबर, हा या लेखाचा मुख्य प्रश्न नाही. प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असू शकते. या लेखाचा उद्देश कोणाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर किंवा आवडीवर टीका करणे नसून, सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक जबाबदारी आणि इतरांच्या गोपनीयतेचा विचार व्हावा, एवढाच आहे. कारण आधुनिक होणे म्हणजे आपली संस्कृती विसरणे नव्हे, तर आधुनिकतेसोबत आपली संस्कृती, संस्कार, वैयक्तिक मर्यादा आणि स्वतःचा सन्मान जपणे होय. ✍️ लेखक : अनिल मुद्दे...

Открыть в Telegram
Просмотры1 820+45%к среднему
Пересылки—
Реакции8
Комментарии—
#37280Фото

टेन्शन... टेन्शन घेतल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट मनावरचा ताण वाढत जातो. माणसाने प्रत्येक गोष्टीचा अति विचार करू नये. कारण कधी कधी घडलेल्या गोष्टींपेक्षा आपण मनात निर्माण केलेले विचारच आपल्याला जास्त त्रास देतात. अति विचारांच्या ओझ्याखाली माणूस वर्तमानात जगायचेच विसरून जातो. उद्याची चिंता करताना आजचा आनंद हरवून बसतो. जे गमावलं त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे, त्यामध्ये आनंद शोधायला शिकायला हवं. कारण मनःशांती आणि आयुष्याचा खरा आनंद हा कोणत्याही बाजारपेठेवर अवलंबून नसतो. कधी कधी हरवलेला आनंद बाहेर शोधण्यापेक्षा तो आपल्या मनातच पुन्हा शोधावा लागतो. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच, फक्त ते शोधताना स्वतःचं समाधान हरवू नये. कारण टेन्शन घेऊन आयुष्य बदलत नाही, पण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्याला नवीन आणि योग्य दिशा प्राप्त करून देतो. ✍️ लेखक : अनिल मुद्दे..

Открыть в Telegram
Просмотры1 680+33%к среднему
Пересылки—
Реакции6
Комментарии—
#37279Текст

खऱ्या प्रेमाचा अर्थ.. एक दिवस सर्वेक्षण करत असताना एका काकांच्या घरी गेलो होतो. मी आणि इंटर्न डॉक्टर त्यांना काही प्रश्न विचारत होतो. त्याचवेळी ते काका मशीनवर पिशव्या शिवण्याचं काम करत होते. छोटंसं भाड्याचं घर, साधी परिस्थिती आणि परिस्थितीशी दोन हात करत जगणारा त्यांचा संसार… बोलता बोलता त्यांच्या आयुष्याचा एक प्रसंग समोर आला. ते एसटीमध्ये काम करत असताना अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना घरी बसावं लागलं. त्या अपघाताने त्यांचं आयुष्य बदललं; पण त्यांच्या पत्नीने हार मानली नाही. नवऱ्याच्या उपचारांसाठी तिने तब्बल नऊ लाख रुपये खर्च केले आणि त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणलं. हे सांगताना काकांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. आपल्या पत्नीबद्दल बोलताना ते भावूक झाले. तिचं शिक्षण कमी असेल, ती फार शिकलेली नसेल; पण तिने आपल्या प्रेमाची जी उंची गाठली होती, ती कदाचित मोठमोठ्या पदव्या मिळवणाऱ्यांनाही गाठता येणार नाही. ते म्हणाले, ‘तिने मला दुसरा जन्म दिला.’ हे वाक्य ऐकताना माझे डोळे नकळत पाणावले. आजच्या काळात नात्यांमधील प्रामाणिकपणा टिकवणं किती कठीण झालं आहे! प्रेमाच्या मोठमोठ्या व्याख्या सांगणाऱ्या जगात, एका छोट्याशा घरात बसलेला हा माणूस आपल्या पत्नीच्या प्रेमाची गोष्ट सांगत होता. तिच्या त्यागाची जाणीव ठेवत होता. तिच्याबद्दल कृतज्ञ होता. त्या क्षणी मला ते दोघे शंकर आणि पार्वतीसारखे भासले. मला कृष्णाचं प्रेम कधी फारसं भावलं नाही. कृष्णाच्या प्रेमात अनेक रूपं, अनेक नाती होती; पण एकनिष्ठतेचा प्रश्न माझ्या मनात नेहमी राहिला. रामाचं प्रेमही मनाला प्रश्न विचारतं—समाजासाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, तिच्या पवित्रतेचा पुरावा द्यावा लागला. पण खरं प्रेम मला शंकराच्या प्रेमात दिसतं. तिचा अपमान झाला, तर तो शांत बसला नाही. तिच्या वेदनेत तो स्वतःच्या अस्तित्वाची वेदना अनुभवत होता. तिच्यासाठी तांडव करू शकणारा, तिच्या प्रेमाखातर संपूर्ण विश्वावर विरक्ती धारण करणारा शंकर… प्रेम म्हणजे केवळ सुंदर शब्द नव्हेत, प्रेम म्हणजे कठीण काळात हात न सोडणं. प्रेम म्हणजे समोरच्या माणसाला पुन्हा जगण्याची संधी देणं. प्रेम म्हणजे त्याच्या वेदनांना स्वतःच्या वेदना समजणं. प्रेम म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत एकमेकांविषयी कृतज्ञ राहणं. त्या दिवशी त्या छोट्याशा घरात मला प्रेमाची कोणतीही मोठी व्याख्या ऐकायला मिळाली नाही; पण एका माणसाच्या डोळ्यांतून त्याच्या पत्नीविषयी वाहणारी कृतज्ञता पाहायला मिळाली. आणि तेव्हाच जाणवलं… प्रेम श्रीमंत घरातच जन्माला येतं असं नाही, प्रेम मोठमोठ्या शब्दांत व्यक्त होतं असंही नाही. कधी कधी ते एका छोट्याशा घरात, पिशव्या शिवणाऱ्या मशीनच्या आवाजात, नऊ लाखांच्या उपचारांत आणि ‘तिने मला दुसरा जन्म दिला’ या एका वाक्यात जिवंत असतं. कदाचित प्रेमाचा खरा अर्थ हाच असावा… एकमेकांना केवळ आयुष्यभर साथ देणं नाही, तर एकमेकांसाठी आयुष्य पुन्हा उभं करणं. # वास्तवातील अनुभव -नम्रता रणसिंग (राजसिंधुकन्या) समाजसेवा अधीक्षक शा.वै.म अलिबाग

Открыть в Telegram
Просмотры1 610+28%к среднему
Пересылки—
Реакции12
Комментарии—
#37277Текст

खरा ब्रँड माणसाच्या विचारांचा असतो... अंगावर ब्रँडेड कपडे, हातात महागडं घड्याळ, पायात ब्रँडेड बूट आणि खिशात महागडा मोबाईल वापरला म्हणजे तो माणूस खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा त्याची विचारसरणी चांगली आहे, असा अनेकांचा समज असतो. पण खरं पाहायला गेलं तर महागड्या वस्तू वापरणं आणि विचारांनी श्रीमंत असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्याचं राहणीमान साधं असतं, तो माणूस विचारांनीही साधाच असेल असं नाही. साध्या राहणीमानात जगणारा माणूससुद्धा विचारांनी, संस्कारांनी आणि कर्तृत्वाने ब्रँडेड असू शकतो. आज समाजात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. साध्या राहणीमानात जगणाऱ्या व्यक्तीला कधी मदतीची गरज असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र, श्रीमंतीचा दिखावा करणाऱ्या व्यक्तीच्या पुढे पुढे करणारे अनेक जण दिसतात. पण आपण आपली विचारसरणी बदलायला हवी. माणूस कोणते कपडे घालतो, कोणता मोबाईल वापरतो किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे, यापेक्षा त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मदतीचा हात देण्याची भावना आपल्यात असायला हवी. कारण वेळ प्रत्येकावर येत असते. रक्ताची गरज भासली तर श्रीमंत असो वा सर्वसामान्य, प्रत्येकाच्या शरीरातील रक्ताचा रंग लालच असतो. त्या वेळी रक्त देणाऱ्या व्यक्तीचा ब्रँड, त्याची गाडी, कपडे किंवा आर्थिक परिस्थिती पाहिली जात नाही. महत्त्वाचं असतं ते माणसाचं आयुष्य वाचवणं. मग दैनंदिन जीवनात आपण माणसामाणसांमध्ये एवढा भेदभाव का करतो? महागड्या वस्तू माणूस विकत घेऊ शकतो, पण माणुसकी, चांगले संस्कार आणि उत्तम विचार हे पैशाने विकत घेता येत नाहीत. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं... ब्रँड वस्तूंचा असतो, माणसांचा नाही; कारण माणसाची खरी ओळख त्याच्या श्रीमंतीने नाही, तर त्याच्या विचारांनी, वागण्याने आणि माणुसकीने होत असते. ✍️ लेखक : अनिल मुद्दे...

Открыть в Telegram
Просмотры1 840+46%к среднему
Пересылки—
Реакции6
Комментарии—