Кабинет
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯 अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】 👇👇Join 👇👇 http://:t.me/ghebhararitu

Юзернейм
@ghebhararitu
Категория
Познавательное
Страна
ИндияИндия
Подписчики18 628
Просмотров на пост, 7 дн.1 259за 7 дней
ERR6,76 %за 7 дней

Средние просмотры поста по дням

По дню публикации

Показать таблицей
ДатаПросмотров на пост
23 нояб. 2026 г.1 730
24 нояб. 2026 г.1 624
25 нояб. 2026 г.1 585
26 нояб. 2026 г.1 162
27 нояб. 2026 г.1 120
28 нояб. 2026 г.745

Самые просматриваемые за месяц

  1. 01

    खरा ब्रँड माणसाच्या विचारांचा असतो... अंगावर ब्रँडेड कपडे, हातात महागडं घड्याळ, पायात ब्रँडेड बूट आणि खिशात महागडा मोबाईल वापरला म्हणजे तो माणूस खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा त्याची विचारसरणी चांगली आहे, असा अनेकांचा समज असतो. पण खरं पाहायला गेलं तर महागड्या वस्तू वापरणं आणि विचारांनी श्रीमंत असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्याचं राहणीमान साधं असतं, तो माणूस विचारांनीही साधाच असेल असं नाही. साध्या राहणीमानात जगणारा माणूससुद्धा विचारांनी, संस्कारांनी आणि कर्तृत्वाने ब्रँडेड असू शकतो. आज समाजात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. साध्या राहणीमानात जगणाऱ्या व्यक्तीला कधी मदतीची गरज असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र, श्रीमंतीचा दिखावा करणाऱ्या व्यक्तीच्या पुढे पुढे करणारे अनेक जण दिसतात. पण आपण आपली विचारसरणी बदलायला हवी. माणूस कोणते कपडे घालतो, कोणता मोबाईल वापरतो किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे, यापेक्षा त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मदतीचा हात देण्याची भावना आपल्यात असायला हवी. कारण वेळ प्रत्येकावर येत असते. रक्ताची गरज भासली तर श्रीमंत असो वा सर्वसामान्य, प्रत्येकाच्या शरीरातील रक्ताचा रंग लालच असतो. त्या वेळी रक्त देणाऱ्या व्यक्तीचा ब्रँड, त्याची गाडी, कपडे किंवा आर्थिक परिस्थिती पाहिली जात नाही. महत्त्वाचं असतं ते माणसाचं आयुष्य वाचवणं. मग दैनंदिन जीवनात आपण माणसामाणसांमध्ये एवढा भेदभाव का करतो? महागड्या वस्तू माणूस विकत घेऊ शकतो, पण माणुसकी, चांगले संस्कार आणि उत्तम विचार हे पैशाने विकत घेता येत नाहीत. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं... ब्रँड वस्तूंचा असतो, माणसांचा नाही; कारण माणसाची खरी ओळख त्याच्या श्रीमंतीने नाही, तर त्याच्या विचारांनी, वागण्याने आणि माणुसकीने होत असते. ✍️ लेखक : अनिल मुद्दे...

    Текст
    Просмотры1,84 тыс.
    Пересылки—
    Реакции6
    Комментарии—
  2. 02

    टॅटू... आधुनिकतेची आवड की बदलती विचारसरणी? आजकाल टॅटू काढण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पूर्वी प्रामुख्याने मुलांमध्ये दिसणारी ही आवड आता मुलींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, नावे किंवा चिन्हे कायमस्वरूपी कोरून घेण्याची जणू फॅशनच झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा अधिकार आहे. टॅटू काढणे हीदेखील वैयक्तिक आवड असू शकते. मात्र कोणतीही फॅशन स्वीकारताना तिच्यामागचा विचार आणि त्याचे परिणाम समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज मुलांप्रमाणेच मुलीही टॅटू काढण्यासाठी दुकानांमध्ये जात आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर, अगदी खासगी भागांवरही टॅटू काढून घेतले जातात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही रील्समध्ये शरीराच्या अतिशय वैयक्तिक भागांवर टॅटू काढतानाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. यामध्ये आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे काही टॅटू शॉपचे मालक टॅटू काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच व्हिडिओ बनवतात आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. विशेषतः शरीराच्या वैयक्तिक भागांवरील टॅटूचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना संबंधित व्यक्तीची स्पष्ट संमती घेतली आहे का? तिच्या गोपनीयतेचा आदर केला आहे का? तिच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला आहे का? हे प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे. प्रसिद्धी, व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात एखाद्याच्या खासगीपणाशी तडजोड होऊ नये. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे व्हिडिओ केवळ मोठी माणसेच पाहतात असे नाही. आज लहान मुलेसुद्धा मोबाईलवर इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स पाहतात. अशा वेळी त्यांच्या वयाला न शोभणारे व्हिडिओ त्यांच्या समोर येऊ शकतात. अशा दृश्यांचा त्यांच्या मनावर, विचारांवर आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करायला नको का? एखाद्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतील, किती लाईक्स येतील यापेक्षा तो व्हिडिओ समाजासमोर प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, याची जाणीव असणे अधिक महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर काहीही प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपली संस्कृती काय आहे, आपली परंपरा काय आहे आणि आपण आधुनिकतेच्या नावाखाली नेमके काय स्वीकारत आहोत, याचाही विचार आजच्या तरुण पिढीने करायला हवा. काळानुसार बदल होणे स्वाभाविक आहे; मात्र बदल स्वीकारताना विवेक, संस्कार आणि वैयक्तिक मर्यादा जपणेही तितकेच आवश्यक आहे. टॅटू काढणे चुकीचे आहे की बरोबर, हा या लेखाचा मुख्य प्रश्न नाही. प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असू शकते. या लेखाचा उद्देश कोणाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर किंवा आवडीवर टीका करणे नसून, सोशल मीडियाचा वापर करताना सामाजिक जबाबदारी आणि इतरांच्या गोपनीयतेचा विचार व्हावा, एवढाच आहे. कारण आधुनिक होणे म्हणजे आपली संस्कृती विसरणे नव्हे, तर आधुनिकतेसोबत आपली संस्कृती, संस्कार, वैयक्तिक मर्यादा आणि स्वतःचा सन्मान जपणे होय. ✍️ लेखक : अनिल मुद्दे...

    Текст
    Просмотры1,82 тыс.
    Пересылки—
    Реакции8
    Комментарии—
  3. 03

    टेन्शन... टेन्शन घेतल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट मनावरचा ताण वाढत जातो. माणसाने प्रत्येक गोष्टीचा अति विचार करू नये. कारण कधी कधी घडलेल्या गोष्टींपेक्षा आपण मनात निर्माण केलेले विचारच आपल्याला जास्त त्रास देतात. अति विचारांच्या ओझ्याखाली माणूस वर्तमानात जगायचेच विसरून जातो. उद्याची चिंता करताना आजचा आनंद हरवून बसतो. जे गमावलं त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे, त्यामध्ये आनंद शोधायला शिकायला हवं. कारण मनःशांती आणि आयुष्याचा खरा आनंद हा कोणत्याही बाजारपेठेवर अवलंबून नसतो. कधी कधी हरवलेला आनंद बाहेर शोधण्यापेक्षा तो आपल्या मनातच पुन्हा शोधावा लागतो. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच, फक्त ते शोधताना स्वतःचं समाधान हरवू नये. कारण टेन्शन घेऊन आयुष्य बदलत नाही, पण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्याला नवीन आणि योग्य दिशा प्राप्त करून देतो. ✍️ लेखक : अनिल मुद्दे..

    Фото
    Просмотры1,68 тыс.
    Пересылки—
    Реакции6
    Комментарии—
  4. 04
    Просмотры1,62 тыс.
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—

Новые посты

#37301Текст

ती परी वाटते... 🥹❤️😇       स्वतःचे स्वप्न स्वाभिमानाने बाळगताना आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः धडपड करताना मी तिला रोज पाहतोय... पैसे कमी असेलही कदाचित, सौंदर्याची ठेवणं जरा कमीच म्हणते, कोणापुढे कधी हात पसरवत नाही😌 ना कोणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून पैसे घेऊन मज्जा करत नाही... अंथरून पाहून पाय पसराव हीच तिच्या आईची शिकवण आहे म्हणून दुकानात गेल्यावर सुंदर नाही तर ती  वस्तू कितीला पडेल याचा जास्त विचार करते...😌 असलं नसलं कोणी आयुष्यात तिच्या तीच ती बिनधास्त जगते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी ती कधी कधी छोट्या गोष्टींचही खूप टेन्शन घेते... 😅 सगळं काही सगळयांचा ऐकून घेते, समजदारीने ती प्रत्येक वेळेस वागते, चुकी असेल तर पायाही पडेल ओ पण चुकी नसताना नजरही खाली न करता बोलण्यास तुटून पडते... ☺️ आईवडिलांच्या अपेक्षा, स्वतःचे स्वप्न, भावंडचे भविष्य, असलेली परिस्तिथी आणि "एक दिवस सगळं काही ठीक होईल" ह्या आशेवर रोज नव्या परिस्तिथी ला तोंड देणारी ती... कधी कधी माझा राग, समस्या, टेन्शन ऐकून खांद्यावर हात ठेवून "होईल रे सगळं नको काळजी करू म्हणून मला धीर देते"... ☺️ खरंतर तिच्याकडे खूप मार्ग होते काहीही न करता सगळं काही मिळवण्याचे पण तिने निवडला तिचा स्वाभिमान, तिचा आत्मसन्मान, योग्य मार्गाने केली जाणारी मेहनत, स्वावलंबीपणा आणि यामुळेच ती मला परी वाटते माझ्या आयुष्यातली माझ्या आईंनंतर मला ती एक स्वाभिमानी स्त्री वाटते...😇❤️ (लिहिलेला लेख पूर्णपणे काल्पनिक पण सत्य घटनेवर आधारित आहे कृपया लेखिकेच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करू नये... 🙏)               ✍प्रियंका भोसले...✍

Открыть в Telegram
Просмотры511−59%к среднему
Пересылки—
Реакции12
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
3 ч483
6 ч511
  1. Через 6 часов511
  2. Всего сейчас511
#37300Текст

‘डी-लिमिटेशन’ अर्थात राजकारणातील ‘कुटुंब नियोजन’ ते ‘संयुक्त कुटुंब’ योजना! आपल्या देशात सामान्य माणसाला काही अवघड इंग्रजी शब्द समजायला जरा वेळच लागतो. त्यातलाच एक सध्या गाजणारा आणि भल्याभल्यांना बुचकळ्यात पाडणारा शब्द म्हणजे ‘डी-लिमिटेशन’ अर्थात मतदारसंघ पुनर्रचना. राज्यशास्त्राच्या पुस्तकात या शब्दाची व्याख्या काहीही असो, पण आपल्याकडच्या अस्सल राजकीय अभ्यासकांनी आणि सोशल मीडियावरील ‘व्हायरल विद्यापीठाने’ या संकल्पनेचा अगदी सोपा, सुटसुटीत आणि थेट काळजाला भिडणारा अर्थ शोधून काढला आहे. तो अर्थ म्हणजे— एकाच घरात सत्तेची जास्तीत जास्त ‘बियाणे’ पेरण्याची सुवर्णसंधी! पूर्वीचे ‘आटोपशीर राजकीय कुटुंब’ पूर्वीच्या काळी, म्हणजेच ‘डी-लिमिटेशन’च्या अगोदर, राजकीय घराण्यांची अवस्था मोठी केविलवाणी असायची हो! बिचाऱ्या नेत्यांना मतदारसंघांची संख्या मर्यादित असल्यामुळे आपल्याच घरातल्या लोकांवर मोठा अन्याय करावा लागायचा. घरात इच्छुक उमेदवारांची रांग लागलेली असायची, पण तिकिटे मात्र मोजकीच असायची. त्यामुळे नाइलाजाने तडजोड करावी लागे. त्या काळातलं एक आदर्श राजकीय कुटुंब कसं दिसायचं? तर ‘साहेब’ स्वतः खासदार असायचे, लाडकी ‘मुलगी’ दुसऱ्या मतदारसंघातून खासदार असायची आणि धाकटा ‘मुलगा’ राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून जनतेची सेवा करत असायचा. बास! एवढ्यावरच त्या बिचाऱ्या कुटुंबाला समाधान मानावं लागायचं. यालाच त्या काळी ‘मर्यादित लोकशाही’ किंवा ‘आटोपशीर राजकीय कुटुंब’ म्हणत असावेत. घरातील ‘जनसेवकांची’ अस्वस्थता पण या मर्यादित जागांमुळे घरातल्या इतर सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ लागली. “साहेब, आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायला आणि निवडणुकीत बुथवर बसायला जन्माला आलो आहोत का?” असा रास्त सवाल घरातील तरुण पिढी विचारू लागली. बायकोचा तर वेगळाच सूर असायचा— “मी घरातले सगळे प्रश्न सोडवते, मग संसदेतले प्रश्न सोडवायला मला का पाठवत नाही?” तिकडे पुतण्या आणि पुतणीही काकांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘जनसेवेसाठी’ गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. नातवाचं तर कॉलेज संपत आलं होतं, त्यालाही आता ‘युवा नेता’ म्हणून मिरवण्याची भारी हौस होती. एकूणच, एकाच वाड्यात इतके ‘जनसेवक’ तयार झाले होते की, त्यांना सामावून घ्यायला भूगोल अपुरा पडू लागला होता. अशा या ऐतिहासिक आणि भावनिक पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठीच जणू ‘डी-लिमिटेशन’चा अवतार झाला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये! डी-लिमिटेशननंतरची नवीन राजकीय रचना आता बघा ना, डी-लिमिटेशननंतर या राजकीय घराण्यांचं चित्र कसं पालटणार आहे. मतदारसंघांची संख्या वाढणार, सीमा बदलणार आणि नव्या जागा निर्माण होणार. याचा थेट फायदा ‘हम दो, हमारे दो’वरून थेट ‘हम सब, और सबके सब’ या नव्या राजकीय धोरणाला होणार आहे. डी-लिमिटेशननंतरच्या आदर्श राजकीय कुटुंबाची रचना काहीशी अशी असेल: साहेब तर खासदार राहतीलच, पण त्यांच्या शेजारच्या मतदारसंघातून आता ‘बायको’ही खासदार म्हणून निवडून येईल. मुलगी खासदार राहीलच, मुलगा आमदार राहीलच; शिवाय आता 'पुतणी' खासदार होईल आणि 'पुतण्या' आमदारकीची माळ गळ्यात घालेल. इतकंच काय, तर आजी-आजोबांच्या पुण्याईने 'नातू'सुद्धा थेट खासदारकीच्या रिंगणात उतरून विजयी होईल! खऱ्या अर्थाने ‘परिवार का विकास’ याला म्हणतात खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, परिवार का विकास’! यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, आता संसदेत किंवा विधानसभेत कोणत्याही विषयावर चर्चा करताना गोंधळ होणार नाही. कारण सत्ताधारी बाकावरही आपलाच माणूस असेल आणि विरोधी बाकावरही चुलत किंवा मामेभाऊच बसलेला असेल. अधिवेशनाच्या काळात वेगवेगळ्या हॉटेलात राहण्याचा खर्च वाचेल; सगळे खासदार आणि आमदार एकाच वाड्यात रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर बसून देशाचे आणि राज्याचे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतील. ‘खासदार निधी’ आणि ‘आमदार निधी’ यांचा एकत्रित निधी थेट एकाच कौटुंबिक ट्रस्टच्या माध्यमातून ‘जनतेच्या’ कल्याणासाठी वापरता येईल. थोडक्यात काय, तर सामान्य माणसासाठी ‘डी-लिमिटेशन’ म्हणजे फक्त मतदारसंघाच्या नकाशावरच्या रेषा बदलणे असेल; पण राजकीय घराण्यांसाठी मात्र ती ‘एक घर, अनेक पदे’ ही महायोजना आहे. लोकशाही ही लोकांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली असते, हे आपण शाळेत शिकलो होतो. आता फक्त त्यात थोडी सुधारणा करून ‘एकाच घरातल्या लोकांनी, एकाच घरातल्या लोकांसाठी चालवलेली व्यवस्था’ अशी नवीन व्याख्या स्वीकारण्याची मानसिक तयारी आपण ठेवायला हवी! डॉ. रुपेशकुमार राऊत.( लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

Открыть в Telegram
Просмотры898−29%к среднему
Пересылки—
Реакции13
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
1 ч264
3 ч506
7 ч898
  1. Через 1 час264
  2. Через 6 часов898
  3. Всего сейчас898
#37299Фото
Просмотры829−34%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
1 ч250
3 ч495
7 ч829
  1. Через 1 час250
  2. Через 6 часов829
  3. Всего сейчас829
#37298Фото

एक महत्त्वाचा मुद्दा मी मिस केला काल, की इलेक्शन लढण्यासाठी पैसा लागतो.. जर इतके जास्त उमेदवार राहिले तर त्यांना सर्व जागांवर उभे करणे आणि त्यांचा इलेक्शन खर्च करण्याची क्षमता सध्या फक्त भाजपकडे आहे.. त्यामुळे इलेक्शन एकतर्फी होण्याची भीती खरी आहे. यांत सुप्रीम कोर्टाची पण चूक आहे, त्यांनी निर्णय दिला की इलेक्ट्रॉल बाँड संविधानाच्या विरुद्ध आहे, आणि ते पैसे तसेच राहू दिले पार्टींकडे. आता फार जास्त विषमता झाली आहे. याला पण शेवटी उत्तर हेच आहे की भारतीय जनतेने स्वतःला पैसे घेऊन मतदान करण्यासाठी विकू नये, तुम्ही मत नाही तर ही लोकशाही पैसेवाल्यांना विकत आहे. अनिकेत पाटील.

Открыть в Telegram
Просмотры782−38%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
3 ч357
5 ч611
7 ч782
  1. Через 6 часов611
  2. Всего сейчас782
#37297Фото
Просмотры711−44%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч136
6 ч711
  1. Через 1 час136
  2. Через 6 часов711
  3. Всего сейчас711
#37296Превью ссылки
Просмотры741−41%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
2 ч290
8 ч741
  1. Через 6 часов741
  2. Всего сейчас741
#37295Текст

पैसा कमवा, पण आयुष्य जगायलाही शिका! मित्र आणि मैत्रिणींनो… आयुष्यामध्ये पैसे कितीही कमवता येतात; पण एकदा गमावलेला जीव पुन्हा मिळवता येत नाही. पैसा कमावण्याच्या धावपळीत आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. दिवसरात्र मेहनत करून पैसा साठवतो; पण स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला विसरतो. आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहतो की, कालपर्यंत हसत-खेळत, चालत-फिरत असलेली व्यक्ती अचानक आपल्यातून निघून जाते. कधी हृदयविकाराचा झटका, तर कधी रक्तदाबातील गंभीर बदल किंवा इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे परिस्थिती अचानक गंभीर होऊ शकते. म्हणूनच वेळोवेळी आरोग्य तपासणी करा, योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि व्यायामासाठीही वेळ काढा. कारण पैशांसोबत थोडं आरोग्यही कमवायला शिका. शरीरासोबत मनाचीही काळजी घ्या. मनातल्या चिंता आणि अडचणी एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, जिच्याजवळ आपण मन मोकळं करू शकतो. मनाला शांतता आणि समाधान मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पैसा कमावण्याच्या धावपळीत आई-वडील, पत्नी, मुलं, मित्रमैत्रिणी आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना वेळ द्यायला विसरू नका. कारण पैसा पुन्हा कमावता येतो; पण आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण पुन्हा अनुभवता येत नाहीत. व्यसन माणसाचं आरोग्य, कुटुंब आणि भविष्य यावर गंभीर परिणाम करू शकतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दोन हात लांब राहा, ही नम्र विनंती. शक्य असेल तिथे गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी हात पुढे करा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण माणुसकीपेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीही नाही. आयुष्यामध्ये कधीही कोणाला कमी समजू नका. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, संघर्ष आणि जगण्याची पद्धत वेगळी असते. आज एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर उद्या ती यशस्वी होऊ शकते. त्यामुळे पैशावरून माणसाची किंमत ठरवू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. आपण अनेकदा एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर म्हणतो, "माणूस खूप चांगला होता!" पण मनात एक प्रश्न येतो, हेच कौतुकाचे शब्द त्या व्यक्तीच्या हयातीत का बोलले जात नाहीत? माणूस जिवंत असतानाच त्याचं कौतुक करा, त्याला प्रेम द्या, त्याचा आदर करा आणि आपुलकीने वागा. प्रत्येक नात्याला महत्त्व द्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. लहानसहान गोष्टी मनात साठवून ठेवू नका. विनाकारण राग, गैरसमज आणि अहंकार वाढवू नका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. ते द्वेषात आणि तक्रारींमध्ये घालवण्यापेक्षा प्रेमाने, हसत-खेळत आणि एकमेकांना समजून घेत जगा. या सर्व गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. आपले आवडते छंद जोपासा आणि स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. सतत जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आवडी-निवडी विसरू नका. आयुष्य कधी संपेल, याची खात्री कोणालाच देता येत नाही. त्यामुळे उद्याची चिंता करत आजचा आनंद गमावू नका. प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घ्या. स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं… पैसा कमवा, पण आरोग्य गमावू नका. शरीराची काळजी घ्या, मनाला शांत ठेवा, कुटुंबाला वेळ द्या, माणसं कमवा आणि नाती जपा. एकमेकांची किंमत जिवंत असतानाच करा. कोणालाही कमी समजू नका आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत राहा. कारण पैसा ही आयुष्याची गरज आहे; पण आरोग्य, प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि मनाचं समाधान हीच आयुष्याची खरी कमाई आहे! ✍️ लेखक : अनिल मुद्दे...

Открыть в Telegram
Просмотры1 280+2%к среднему
Пересылки—
Реакции6
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
14 ч734
25 ч1 280
  1. Через 24 часа1 280
  2. Всего сейчас1 280
#37294Фото
Просмотры1 070−15%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
14 ч706
25 ч1 070
  1. Через 24 часа1 070
  2. Всего сейчас1 070
#37293Текст
Просмотры1 010−20%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#37292Фото
Просмотры1 270+1%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—

Все посты

Связи