ती परी वाटते... 🥹❤️😇 स्वतःचे स्वप्न स्वाभिमानाने बाळगताना आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः धडपड करताना मी तिला रोज पाहतोय... पैसे कमी असेलही कदाचित, सौंदर्याची ठेवणं जरा कमीच म्हणते, कोणापुढे कधी हात पसरवत नाही😌 ना कोणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून पैसे घेऊन मज्जा करत नाही... अंथरून पाहून पाय पसराव हीच तिच्या आईची शिकवण आहे म्हणून दुकानात गेल्यावर सुंदर नाही तर ती वस्तू कितीला पडेल याचा जास्त विचार करते...😌 असलं नसलं कोणी आयुष्यात तिच्या तीच ती बिनधास्त जगते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी ती कधी कधी छोट्या गोष्टींचही खूप टेन्शन घेते... 😅 सगळं काही सगळयांचा ऐकून घेते, समजदारीने ती प्रत्येक वेळेस वागते, चुकी असेल तर पायाही पडेल ओ पण चुकी नसताना नजरही खाली न करता बोलण्यास तुटून पडते... ☺️ आईवडिलांच्या अपेक्षा, स्वतःचे स्वप्न, भावंडचे भविष्य, असलेली परिस्तिथी आणि "एक दिवस सगळं काही ठीक होईल" ह्या आशेवर रोज नव्या परिस्तिथी ला तोंड देणारी ती... कधी कधी माझा राग, समस्या, टेन्शन ऐकून खांद्यावर हात ठेवून "होईल रे सगळं नको काळजी करू म्हणून मला धीर देते"... ☺️ खरंतर तिच्याकडे खूप मार्ग होते काहीही न करता सगळं काही मिळवण्याचे पण तिने निवडला तिचा स्वाभिमान, तिचा आत्मसन्मान, योग्य मार्गाने केली जाणारी मेहनत, स्वावलंबीपणा आणि यामुळेच ती मला परी वाटते माझ्या आयुष्यातली माझ्या आईंनंतर मला ती एक स्वाभिमानी स्त्री वाटते...😇❤️ (लिहिलेला लेख पूर्णपणे काल्पनिक पण सत्य घटनेवर आधारित आहे कृपया लेखिकेच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करू नये... 🙏) ✍प्रियंका भोसले...✍
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 3 h | 483 |
| 6 h | 511 |
- After 6 hours511
- Total to date511