
कृषिसेवक - पुणे विभाग
पुणे विभाग कृषिसेवक संपूर्ण माहिती... https://t.me/punekrushi कोल्हापूर विभाग कृषिसेवक https://t.me/kopkrushisevak
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 13, 2026 | 987 |
| Nov 14, 2026 | 990 |
| Nov 17, 2026 | 916 |
| Nov 18, 2026 | 784 |
| Nov 19, 2026 | 890 |
| Nov 20, 2026 | 879 |
| Nov 21, 2026 | 757 |
| Nov 22, 2026 | 615 |
| Nov 24, 2026 | 416 |
Most viewed this month
- 01Views1.13KForwards—Reactions—Comments—
- 02Views1.05KForwards—Reactions—Comments—
- 03Views1.05KForwards—Reactions—Comments—
- 04Views1.05KForwards—Reactions—Comments—
Latest posts
ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळणार · मदत व पुनर्वसन विभागाची माहिती · दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन संवेदनशील मुंबई, दि. २१ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर तसेच आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. पीक नुकसान, घटलेले उत्पन्न आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मदत देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या दुष्काळी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार मदत वितरित करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करणे आणि तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे निकाली काढणे यावर मदत व पुनर्वसन विभागाचा भर आहे. अशा प्रकरणांची छाननी करून निर्धारित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ३१० तालुके दुष्काळग्रस्त घोषित राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आणखी सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० झाली आहे. या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्धारित निकषांनुसार मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत ॲग्रीस्टॅक प्रणालीवर राज्यातील सुमारे १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी होऊन त्यांना फार्मर आयडी देण्यात आला आहे. यापैकी सुमारे ९४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. ही मदत शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२६ आणि पीक नुकसानीसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार वितरित करण्यात येत आहे. मदतीचे वितरण निश्चित निकषांनुसार पीक नुकसानीचे क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निर्धारित निकषांनुसार मदत देण्यात येत आहे. मदत वितरणापूर्वी शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी, नोंदींचे प्रमाणीकरण आणि पात्रतेची तपासणी करण्यात येते. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा केली जाते. आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे काही व्यवहार अयशस्वी झाले आहेत. तसेच वारस नोंदी, नावातील तफावत, प्रतिबंधित जमीन नोंदी आणि चुकीची अथवा विसंगत माहिती यामुळे काही फार्मर आयडींच्या पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत. अशा प्रकरणांची छाननी करून निर्धारित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जात आहे. गेल्या १५ दिवसांत चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नव्याने फार्मर आयडी प्राप्त केले आहेत. या शेतकऱ्यांच्या नोंदींची निर्धारित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार त्यांचाही मदतीसाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे फार्मर आयडी किंवा तांत्रिक कारणांमुळे मदत मिळण्यास विलंब झालेल्या प्रकरणांमध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाची कार्यवाही सुरू २८ ऑक्टोबर २०२६ मधील तरतुदीनुसार मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय लाभार्थ्यांची यादी आणि वितरित करण्यात आलेल्या मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. यामुळे मदत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यास मदत होणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करणे आणि तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे निकाली काढणे यावर मदत व पुनर्वसन विभागाचा भर आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाच्या निर्धारित धोरणानुसार मदत वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
Open in Telegram👩💻 *शेतकरी यांना स्वतः Agristack Profile मध्ये पुढील दुरूस्ती उपलब्ध आहेत.* mhfr.agristack.gov.in 📌या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी यांनी Farmer Login निवडावे (यापूर्वी नोंदणी झाली असता Forget Password -Role Farmer आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा Text Msg मध्ये ID व password प्राप्त होईल) 📌Farmer Login ने login झाल्यावर Home 1. Enrollment ID 2. Farmer Name 3. Farmer Enrollment Date 4. Farmer ID 5. Approval Status उपलब्ध आहे 📌 Check Enrollment Status मध्ये मान्यता Pending असल्यास तपशील दिसेल. 📌 Viwe My Information माहिती Download करिता उपलब्ध आहे 📌 Update My Information 1. KYC Details - KYC Verification 2. Land Ownership Details नविन शेती जोडणे किंवा शेती कमी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे तसेच मोबाईल क्रमांक व जात प्रवर्ग दुरुस्ती उपलब्ध आहेत शेतकरी यांना स्वतः Agristack Profile मध्ये पुढील दुरूस्ती उपलब्ध आहेत mhfr.agristack.gov.in 📌या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी यांनी Farmer Login निवडावे (यापूर्वी नोंदणी झाली असता Forget Password -Role Farmer आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा Text Msg मध्ये ID व password प्राप्त होईल) 📌Farmer Login ने login झाल्यावर Home 1. Enrollment ID 2. Farmer Name 3. Farmer Enrollment Date 4. Farmer ID 5. Approval Status उपलब्ध आहे 📌 Check Enrollment Status मध्ये मान्यता Pending असल्यास तपशील दिसेल. 📌 Viwe My Information माहिती Download करिता उपलब्ध आहे 📌 Update My Information 1. KYC Details - KYC Verification 2. Land Ownership Details नविन शेती जोडणे किंवा शेती कमी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे तसेच मोबाईल क्रमांक व जात प्रवर्ग दुरुस्ती उपलब्ध आहेत
Open in TelegramConnections
Similar channels
PIB India@pibindiaenglishNews and media3.99K- CyberSipahi@cybersipahiNews and media3.68K
𝗕𝗛𝗔𝗥𝗔𝗧 𝗙𝗜𝗥𝗦𝗧@akhandbharat_firstNews and media4.72K
MediaOne News@mediaonetvNews and media4.73K
BBC News Tamil@bbctamilNews and media4.87K
DEFENCE CAFE - News 🗞@defencecafeNews and media5.02K- India Sentinel Network@isnreportNews and media5.11K
TeachersWorld@andhrateachersNews and media2.94K