प्रत्येक गोष्ट ही ठरावीक काळासाठीच आपली असते 'त्यामुळे योग्य वेळेतच तिचा आनंद घ्यायचा असतो... ❣️❣️❣️
Открыть в Telegramवास्तव (सत्य की आभास)©®
मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही..... Contact to Admin👉 @Vastav_bot (For Promotion and others)
Средние просмотры поста по дням
По дню публикации
Показать таблицей
| Дата | Просмотров на пост |
|---|---|
| 5 нояб. 2026 г. | 1 740 |
| 8 нояб. 2026 г. | 1 480 |
| 11 нояб. 2026 г. | 1 260 |
| 22 нояб. 2026 г. | 530 |
Самые просматриваемые за месяц
- 01Просмотры1,74 тыс.Пересылки—Реакции1Комментарии—
- 02Просмотры1,48 тыс.Пересылки—Реакции4Комментарии—
- 03Просмотры1,26 тыс.Пересылки—Реакции4Комментарии—
- 04
प्रत्येक गोष्ट ही ठरावीक काळासाठीच आपली असते 'त्यामुळे योग्य वेळेतच तिचा आनंद घ्यायचा असतो... ❣️❣️❣️
Просмотры530Пересылки—Реакции10Комментарии—
Новые посты
🏮🏮भाऊबीज🏮🏮 निर्मळाहुनी निर्मळ नातं मुक्ताई ज्ञानाचे, जगी धन्य झाले नाते बहीण भाऊ प्रेमाचे, जपावे बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळूवार, निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताईने.. 🙏🙏🙏शुभ दीपावली 🙏🙏🙏
Открыть в Telegramमी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ... 🪔 दिपावली 🪔 च्या हार्दिक शुभेच्छा…! ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..! धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..! 🪔 !! शुभ दिपावली !!🪔
Открыть в Telegramदिवाळीचा पहिला दिवस : गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस! भारतीय कृषिप्रधान संस्कृतीत गाय ही केवळ पशुधन नव्हे, तर पालनपोषण, समृद्धी आणि मातृत्वाचं प्रतीक मानली गेली आहे. गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्यामागे मातृत्व, वात्सल्य, निःस्वार्थ प्रेम आणि आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर भावना आहे. मातृत्वाचा खरा सन्मान केवळ पूजेतून नव्हे, तर प्रेम, करुणा आणि संवेदनशील वागण्यातून व्यक्त होतो. गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺
Открыть в Telegram🪷 "कोजागिरीच्या रात्री आता कुठल्या कविता,कुठले गीत चंद्रभारले कविजन बसती सोड्यासंगे काही पीत!" आज कोजागिरी पौर्णिमा,पुर्वी कोजागिरीला सर्व जण एकत्र जमत गप्पा-गोष्टी,गाणी-कविता वाचन चाले,काळानूसार ते कमी झाले,आता बर्याचवेळा चंद्र ढगाआडच असतो!.यावर गदिमांची एक 'चंद्रग्रहण' नावाची कविता आठवली...त्यात यावरच भाष्य करताना ते म्हणतात.. चंद्रग्रहण कुठे करितसे पारध मानव कुठे पोचले त्याचे ज्ञान चंद्रलोकिच्या हरिणामागे धरणीवरचे धावे श्वान! शारदियेच्या चंद्रकलेचा पार उडुनिया गेला रंग 'चकोर तलगे' जळुन मेली अणुशक्तीने भाजुन अंग! चंद्रमुखी या विशेषणावर ठिक्कर काळे पडले डाग 'चंद्रमुखी' ही हाक मारिता सुमुखींना ये भलता राग! आंग्ल कवीची मड्डम होती परवा परवा 'लेडी मून' मराठीतला जुना हाटही तिला ठरवतो आता जून कोजागिरीच्या रात्री आता कुठल्या कविता,कुठले गीत चंद्रभारले कविजन बसती सोड्यासंगे काही पीत! गीर्वाणातिल साहित्याचा खलास झाला अर्धा भाग विज्ञानाची व्रात्य वाळवी 'चांद्र' तयाचा मांडी याग! चंद्रग्रहण हे सुटणे नाही क्रोधी मंगळ झाला लाल साहित्याच्या यात्रेमधुनी नक्षत्रांचे उठले पाल. - ग.दि.माडगूळकर 😊
Открыть в Telegram🪷 💔 हरवलेलं परत मिळत नाही… माणसाचं आयुष्य किती विचित्र असतं ना! आपण बाहेरून हसत असतो, रोजची कामं करत असतो, जगासमोर अगदी व्यवस्थित असल्याचं दाखवत असतो; पण मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी कायमचं हरवलेलं असतं. कधी एखादी व्यक्ती, कधी एखादं नातं, कधी एखादं स्वप्न, तर कधी स्वतःचं पूर्वीसारखं आनंदी असणारं मन... काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या जगण्याचा एक भाग बनून जातात. त्यांच्या एका मेसेजने चेहऱ्यावर हसू येतं, त्यांच्या दोन शब्दांनी मनाला आधार मिळतो आणि त्यांच्या सहवासात आयुष्य सुंदर वाटू लागतं. हळूहळू आपण त्यांच्यावर इतके अवलंबून होतो की, त्यांच्या अनुपस्थितीतही मन त्यांचीच वाट पाहत राहतं. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही. काही माणसं अचानक दूर जातात, काही परिस्थितीमुळे दुरावतात, तर काही जवळ असूनही मनापासून आपली राहत नाहीत. सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे? ज्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते, तिच्याशिवाय जगण्याची वेळ येते तेव्हा! रोज बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकायला मिळत नाही, मनातलं सांगण्यासाठी आपलं माणूस जवळ नसतं आणि ज्याच्यासाठी आपण मनापासून वेळ काढलेला असतो, त्याच्याकडे आपल्यासाठी दोन क्षणही नसतात. तेव्हा मन अस्वस्थ होतं. आठवणींची गर्दी होते आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनाही कधी कधी शब्द सापडत नाहीत. माणूस हरवलेल्या गोष्टीपेक्षा ती परत मिळणार नाही, या जाणिवेने जास्त तुटतो. कारण मनाला शेवटपर्यंत एक छोटीशी आशा असते—कदाचित पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल, कदाचित ती व्यक्ती पुन्हा जवळ येईल, कदाचित पुन्हा एकदा मनापासून संवाद होईल! पण जेव्हा या आशेचं रूपांतर प्रतीक्षेत होतं आणि प्रतीक्षेचं रूपांतर सवयीत होतं, तेव्हा माणूस हळूहळू आतून शांत व्हायला शिकतो. काही जखमा अशा असतात की त्यांच्यावर औषध लावता येत नाही. काळ त्यांची तीव्रता कमी करतो, पण त्यांचे व्रण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम राहतात. एखादं गाणं, एखादा रस्ता, एखादी तारीख किंवा एखादा साधा शब्दसुद्धा जुन्या आठवणींना पुन्हा जागं करतो. आपण क्षणभर भूतकाळात जातो आणि मनाला जाणवतं की, ते दिवस आता फक्त आठवणीतच उरले आहेत. पण मित्रांनो, आयुष्याचा अर्थ केवळ हरवलेल्या गोष्टींचा शोक करण्यात नाही. काही गोष्टी आपल्याला मिळतात, काही आपल्याकडून निघून जातात आणि काही गोष्टी आपल्याला आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जातात. प्रत्येक दुरावलेलं नातं आपली चूक नसतं आणि प्रत्येक नातं वाचवण्याची जबाबदारी एकट्याची नसते. प्रेम करा, जिव्हाळा ठेवा, मनापासून नाती जपा; पण स्वतःला इतकं विसरू नका की दुसऱ्याच्या अनुपस्थितीत स्वतःचं अस्तित्वच हरवून बसेल. ज्यांना तुमची किंमत आहे, त्यांच्यासाठी वेळ काढा. ज्यांना तुमच्या भावनांची जाणीव आहे, त्यांना मनात जागा द्या. पण जिथे सतत तुमच्याच मनाला समजावावं लागतं, जिथे तुमच्याच डोळ्यांत पाणी येतं आणि जिथे तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही, तिथे स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला शिका. कारण आयुष्यात काही माणसं पुन्हा भेटतील, काही नाती नव्याने जुळतील, काही स्वप्नं पुन्हा फुलतील; पण गेलेला काळ आणि त्या काळात जगलेले काही खास क्षण पुन्हा कधीच परत येणार नाहीत. नाहीत. म्हणून जे जवळ आहे त्याची किंमत ओळखा, जे दूर गेलं त्याला शांतपणे निरोप द्या आणि जे उरलं आहे त्यात जगण्याचा आनंद शोधा. शेवटी एवढंच... हरवलेलं परत मिळवण्याच्या नादात, हातात उरलेलं गमावू नका... आठवणी जपा, पण त्यात स्वतःला हरवू नका... दुसऱ्यांवर प्रेम करा, पण स्वतःवरचं प्रेम कधीच कमी करू नका... कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि मन एकदा खूप थकलं की, त्याला पुन्हा हसवण्यासाठी कधी कधी संपूर्ण आयुष्य अपुरं पडतं...! 💐 क्रेडिट : सुजित गांवकर 😊
Открыть в Telegramप्रत्येकाच्या आयुष्यात सत्याचा विजय होवो, सुख-समृद्धी नांदो आणि नव्या स्वप्नांना पूर्तता लाभो. सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही, पण नशिबानं तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मला मिळाली. ती अनमोल आहेत सोन्यासारखे तुम्ही आहातच. सदैव आरोग्यसंपन्न राहा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Открыть в Telegramसोन्यासारख्या आयुष्याला सोन्यासारखी माणसं लाभण्याचा हट्ट, आयुष्याला गंजलेल लोखंड करून सोडतो....🚩🚩🚩 दसरा विजयादशमी
Открыть в Telegramघाबरू नका. निडर रहा. जो घाबरतो तो संपतो. " अपने कर्तव्य पर ध्यान दो पार्थ, परिणाम की चिंता मत करो " परिणामांची चिंता निर्णय घेण्याआधी करायची असते निर्णय घेतल्यावर नाही 💯
Открыть в TelegramСвязи
Похожие каналы
- 🖤 Love & sad s̤t̤a̤t̤ṳs̤ 🖤@blackheartlovesadstatusЦитаты3,29 тыс.
सुविचारों का दरिया😇@suvichar_ka_dariyaЦитаты3,35 тыс.
💖जज़्बात-ए-शायर❤️@dilshayariЦитаты2,8 тыс.
Hindi Shayari Quotes Sad Love Motivational Shayaris club हिन्दी शायरी@shayari_hindi1Цитаты3,84 тыс.
Beautiful shayari beautiful shayari ❤️🌎@heartless_shyariЦитаты4,19 тыс.
Sadguru Quotes@sadhgururocksЦитаты4,25 тыс.
Gujarati premi@gujaratipremiЦитаты4,46 тыс.- ❣️Dilo ki dastan ❤️💛💜❣️@dilokidastanЦитаты2,28 тыс.