Кабинет

Посты канала डॉ. शैलेंद्र देवळाणकर

сначала новые

#2700Превью ссылки

https://youtu.be/Gb4_9HjO1cA?si=Wg27M92RJneOuN-L ट्रम्प यांचे नवे टॅरिफ युद्ध:दबावतंत्राचा कांगावा माझी निरीक्षणे आणि विश्लेषण :- 1.प्रथम तर हे लक्षात घ्या ....हे नवे टॅरिफ अमेरिकेच्या १९७४ च्या व्यापार कायद्याच्या कलम ३०१ अंतर्गत घोषित केले आहेत. ‘अन्याय्य व्यापार पद्धती’ अशा विविध कारणांखाली टॅरिफ लावण्याचे व्यापक अधिकार या कलमानुसार अमेरिकन प्रशासन आणि अध्यक्षांना देण्यात आले आहे 2.इराणविरुद्ध युद्धाऐवजी ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ युद्ध सुरू केले आहे.१४ देशांवर साधारण १७ ते ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफ प्रस्तावित आहेत आणि ते जानेवारीपासून लागू होण्याचे संकेत आहेत. 3.प्रत्येक घोषणेला ट्रेड डीलची अट जोडलेली आहे.भारतावर २५% टॅरिफ प्रस्तावित आहे, पण करार झाल्यास तो १७% वर येईल.म्हणजेच व्यापार करारातून अधिक सवलती पदरात पाडून घेण्यासाठीचे हे दबावतंत्र आहे. 4.भारताविरुद्ध टॅरिफ लावण्यासाठी देण्यात आलेली 'अतिरिक्त उत्पादनक्षमता’ आणि ‘मेक इन इंडिया’ला मिळणारी सरकारी सबसिडी ही कारणे हास्यास्पद आणि विरोधाभासी आहेत. कारण खुद्द अमेरिकाच सेमीकंडक्टर उद्योगात सुमारे ९ अब्ज डॉलर गुंतवून १०% हिस्सा घेत आहे. 5.चीन, अमेरिका आणि युरोपने उत्पादन आणि निर्यात वाढवायची,पण भारतासारख्या देशांनी ती वाढवायची नाही, हा नवा वसाहतवादच आहे.अशा धमक्यांपुढे भारताने अजिबात झुकू नये. 6.यातून भारताचे फार मोठे नुकसान होणार नाही.ऑटो पार्ट्स, रत्ने आणि दागिने, चामड्याच्या वस्तू, वस्त्रे, डेअरी आणि मत्स्य उत्पादनांसाठी भारताने गेल्या दोन वर्षांत चार महत्त्वाचे व्यापार करार केले आहेत.त्यातून युरोप, मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियात पर्यायी बाजारपेठा मिळाल्या आहेत. 7.चीन, इंडोनेशिया आणि थायलंड यांच्यावरही २५ ते ४०% टॅरिफ आहे.त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार नाही. 8.पूर्वीप्रमाणेच अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय हा निर्णयही रद्द करू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. 9.६०% पेक्षा अधिक अमेरिकन नागरिकांचा या धोरणाला विरोध आहे. टॅरिफमुळे वाढलेल्या महागाईमुळेच रिपब्लिकन पक्षाला मध्यावधी निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.तरीही ट्रम्प आपल्या चुकांमधून शिकत नाहीत. 10.एकूणच हा धमकावण्याचा ‘फुसका बार’ आहे आणि तो प्रत्यक्षात कितपत लागू होईल याबद्दल साशंकता आहे. #टॅरिफयुद्ध #ट्रम्प #भारतअमेरिका #व्यापारकरार #मेकइनइंडिया #नववसाहतवाद #आत्मनिर्भरभारत #परराष्ट्रधोरण #जागतिकराजकारण #अर्थकारण #विश्ववेध #TariffWar #TrumpTariffs #Section301 #IndiaUSTrade #TradeDeal #IndiaUSRelations #MakeInIndia #NeoColonialism #Geopolitics #GlobalTrade #USTR #IndianEconomy #ForeignPolicy #TradeWar #Protectionism #AtmanirbharBharat

Открыть в Telegram
Просмотры153−74%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#2698Превью ссылки

https://youtu.be/Z_lhxphW0Zg *अवघ्या ११ दिवसांत जेनसन हुआंग पुन्हा एनव्हिडियाच्या सर्वोच्च पदावर. पण खरा प्रश्न आहे, हे कसं घडलं ?* *-डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक* विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण समोर आलं. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे ज्या महिलेशी त्यांचे संबंध होते,ती चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना आहे.या दबावाखाली हुआंग यांना सीईओ आणि बोर्ड सदस्यपद सोडावं लागलं. चौकशी अजूनही सुरू आहे.तरीही एनव्हिडियाने त्यांना पुन्हा नियुक्त केलं, आणि त्यासाठी “अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ पातळीवरून” सल्ला मिळाल्याचं कंपनीनेच मान्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट जाहीर केलं की जेनसन यांचं परतणं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक नाही.आणि त्यांच्या पोस्टमध्ये चीनचं नावही नाही.हा योगायोग नाही.ट्रम्प चीनशी उघड संघर्ष टाळत आहेत,शी जिनपिंग यांच्याशी जुळवून घेत आहेत.अमेरिकेच्या धोरणांवर चीनचा वाढता प्रभाव यातून स्पष्ट दिसतो. या घटनेचा जागतिक तंत्रज्ञान स्पर्धा, अमेरिका-चीन संबंध आणि भारतावर होणारा परिणाम मी या व्हिडिओत मांडला आहे. संपूर्ण विश्लेषण नक्की पाहा. @nvidia @realdonaldtrump @whitehouse @POTUS @Reuters @BBCWorld (Instagram वर ट्रम्प यांचं हँडल @realdonaldtrump आहे. X वर @realDonaldTrump #JensenHuang #Nvidia #DonaldTrump #USChinaRelations #Geopolitics #XiJinping #TechWar #AIChips #Semiconductors #NationalSecurity #मराठी #आंतरराष्ट्रीयराजकारण #भूराजकारण Instagram #JensenHuang #NvidiaCEO #Trump #ChinaInfluence #USChina #GeopoliticsExplained #AIRace #ChipWar #WorldPolitics #MarathiNews #मराठीबातम्या #जागतिकराजकारण #चीन

Открыть в Telegram
Просмотры321−46%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2689Превью ссылки

https://youtu.be/qg3-qB8EACY https://youtu.be/qg3-qB8EACY?si=9bi4sRH7B4iqO5mM *एपेक परिषदेच्या निमित्ताने ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीकडे जगाचे लक्ष का लागले आहे?* या भेटीच्या चर्चेला ‘याल्टा २.०’ असे का संबोधले जात आहे? १९४५ च्या याल्टा परिषदेचा संदर्भ आजच्या सत्तासमीकरणांशी कसा जोडला जातो? युक्रेनच्या भवितव्याबाबत मोठ्या शक्तींमध्ये काही तडजोड होऊ शकते का? युरोपची सुरक्षा, रशियाच्या अपेक्षा आणि अमेरिका–चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांना विशेष महत्त्व आहे. मात्र, संभाव्य चर्चा आणि प्रत्यक्ष निर्णय यांतील फरकही लक्षात घ्यावा लागेल. या घडामोडींचा अर्थ, त्यामागील हितसंबंध आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम यांचा सविस्तर ऊहापोह मी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.ही मुलाखत येथे सादर करत आहे. #APEC #APEC2026 #APECChina #APEC summit #Shenzhen #China #Trump

Открыть в Telegram
Просмотры613+3%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#2680Превью ссылки

https://x.com/skdeolankar जागतिक घडामोडींचे अचूक विश्लेषण: @skdeolankar भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, परराष्ट्र धोरण,तेल सुरक्षा,जागतिक संघर्ष,आंतरराष्ट्रीय संस्था-संघटना, आर्थिक घडामोडी,भारताचा आर्थिक विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातील बदल या सर्व विषयांवरचे अद्ययावत विश्लेषण आता एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.गेल्या दोन दशकांपासून परराष्ट्र धोरणाचे विश्लेषण करणारे डॉ. शैलेंद्र देवळाणकर (@skdeolankar) आपल्या X हँडलवरून या विषयांवर सातत्याने अपडेट्स देतात.स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी,पत्रकार आणि प्राध्यापक यांच्यासाठी ही माहिती विशेष उपयुक्त ठरेल.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.जगाच्या घडामोडींचा प्रत्येक महत्त्वाचा अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा: @skdeolankar #परराष्ट्रधोरण #स्पर्धापरीक्षा #MPSC #UPSC #Geopolitics #CurrentAffairs

Открыть в Telegram
Просмотры828+40%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—