Кабинет
डॉ. शैलेंद्र देवळाणकर

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर https://t.me/skdeolankar https://www.facebook.com/skdeolankar/ http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध https://twitter.com/skdeolankar?s=09

Юзернейм
@skdeolankar
Категория
Политика
Страна
ИндияИндия
Подписчики4 510
Просмотров на пост, 7 дн.454−40,3% к пред. 7 дн.
ERR10,08 %за 7 дней

Средние просмотры поста по дням

По дню публикации

Показать таблицей
ДатаПросмотров на пост
14 нояб. 2026 г.885
15 нояб. 2026 г.878
18 нояб. 2026 г.658
19 нояб. 2026 г.564
20 нояб. 2026 г.601
21 нояб. 2026 г.516
22 нояб. 2026 г.519
23 нояб. 2026 г.408
24 нояб. 2026 г.321
25 нояб. 2026 г.271
26 нояб. 2026 г.153

Самые просматриваемые за месяц

  1. 01
    Просмотры927
    Пересылки—
    Реакции4
    Комментарии—
  2. 02
    Просмотры901
    Пересылки—
    Реакции2
    Комментарии—
  3. 03
    Просмотры899
    Пересылки—
    Реакции4
    Комментарии—
  4. 04
    Просмотры856
    Пересылки—
    Реакции4
    Комментарии—

Новые посты

#2700Превью ссылки

https://youtu.be/Gb4_9HjO1cA?si=Wg27M92RJneOuN-L ट्रम्प यांचे नवे टॅरिफ युद्ध:दबावतंत्राचा कांगावा माझी निरीक्षणे आणि विश्लेषण :- 1.प्रथम तर हे लक्षात घ्या ....हे नवे टॅरिफ अमेरिकेच्या १९७४ च्या व्यापार कायद्याच्या कलम ३०१ अंतर्गत घोषित केले आहेत. ‘अन्याय्य व्यापार पद्धती’ अशा विविध कारणांखाली टॅरिफ लावण्याचे व्यापक अधिकार या कलमानुसार अमेरिकन प्रशासन आणि अध्यक्षांना देण्यात आले आहे 2.इराणविरुद्ध युद्धाऐवजी ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ युद्ध सुरू केले आहे.१४ देशांवर साधारण १७ ते ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफ प्रस्तावित आहेत आणि ते जानेवारीपासून लागू होण्याचे संकेत आहेत. 3.प्रत्येक घोषणेला ट्रेड डीलची अट जोडलेली आहे.भारतावर २५% टॅरिफ प्रस्तावित आहे, पण करार झाल्यास तो १७% वर येईल.म्हणजेच व्यापार करारातून अधिक सवलती पदरात पाडून घेण्यासाठीचे हे दबावतंत्र आहे. 4.भारताविरुद्ध टॅरिफ लावण्यासाठी देण्यात आलेली 'अतिरिक्त उत्पादनक्षमता’ आणि ‘मेक इन इंडिया’ला मिळणारी सरकारी सबसिडी ही कारणे हास्यास्पद आणि विरोधाभासी आहेत. कारण खुद्द अमेरिकाच सेमीकंडक्टर उद्योगात सुमारे ९ अब्ज डॉलर गुंतवून १०% हिस्सा घेत आहे. 5.चीन, अमेरिका आणि युरोपने उत्पादन आणि निर्यात वाढवायची,पण भारतासारख्या देशांनी ती वाढवायची नाही, हा नवा वसाहतवादच आहे.अशा धमक्यांपुढे भारताने अजिबात झुकू नये. 6.यातून भारताचे फार मोठे नुकसान होणार नाही.ऑटो पार्ट्स, रत्ने आणि दागिने, चामड्याच्या वस्तू, वस्त्रे, डेअरी आणि मत्स्य उत्पादनांसाठी भारताने गेल्या दोन वर्षांत चार महत्त्वाचे व्यापार करार केले आहेत.त्यातून युरोप, मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियात पर्यायी बाजारपेठा मिळाल्या आहेत. 7.चीन, इंडोनेशिया आणि थायलंड यांच्यावरही २५ ते ४०% टॅरिफ आहे.त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार नाही. 8.पूर्वीप्रमाणेच अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय हा निर्णयही रद्द करू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. 9.६०% पेक्षा अधिक अमेरिकन नागरिकांचा या धोरणाला विरोध आहे. टॅरिफमुळे वाढलेल्या महागाईमुळेच रिपब्लिकन पक्षाला मध्यावधी निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.तरीही ट्रम्प आपल्या चुकांमधून शिकत नाहीत. 10.एकूणच हा धमकावण्याचा ‘फुसका बार’ आहे आणि तो प्रत्यक्षात कितपत लागू होईल याबद्दल साशंकता आहे. #टॅरिफयुद्ध #ट्रम्प #भारतअमेरिका #व्यापारकरार #मेकइनइंडिया #नववसाहतवाद #आत्मनिर्भरभारत #परराष्ट्रधोरण #जागतिकराजकारण #अर्थकारण #विश्ववेध #TariffWar #TrumpTariffs #Section301 #IndiaUSTrade #TradeDeal #IndiaUSRelations #MakeInIndia #NeoColonialism #Geopolitics #GlobalTrade #USTR #IndianEconomy #ForeignPolicy #TradeWar #Protectionism #AtmanirbharBharat

Открыть в Telegram
Просмотры153−74%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—
#2698Превью ссылки

https://youtu.be/Z_lhxphW0Zg *अवघ्या ११ दिवसांत जेनसन हुआंग पुन्हा एनव्हिडियाच्या सर्वोच्च पदावर. पण खरा प्रश्न आहे, हे कसं घडलं ?* *-डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक* विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण समोर आलं. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे ज्या महिलेशी त्यांचे संबंध होते,ती चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना आहे.या दबावाखाली हुआंग यांना सीईओ आणि बोर्ड सदस्यपद सोडावं लागलं. चौकशी अजूनही सुरू आहे.तरीही एनव्हिडियाने त्यांना पुन्हा नियुक्त केलं, आणि त्यासाठी “अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ पातळीवरून” सल्ला मिळाल्याचं कंपनीनेच मान्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट जाहीर केलं की जेनसन यांचं परतणं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक नाही.आणि त्यांच्या पोस्टमध्ये चीनचं नावही नाही.हा योगायोग नाही.ट्रम्प चीनशी उघड संघर्ष टाळत आहेत,शी जिनपिंग यांच्याशी जुळवून घेत आहेत.अमेरिकेच्या धोरणांवर चीनचा वाढता प्रभाव यातून स्पष्ट दिसतो. या घटनेचा जागतिक तंत्रज्ञान स्पर्धा, अमेरिका-चीन संबंध आणि भारतावर होणारा परिणाम मी या व्हिडिओत मांडला आहे. संपूर्ण विश्लेषण नक्की पाहा. @nvidia @realdonaldtrump @whitehouse @POTUS @Reuters @BBCWorld (Instagram वर ट्रम्प यांचं हँडल @realdonaldtrump आहे. X वर @realDonaldTrump #JensenHuang #Nvidia #DonaldTrump #USChinaRelations #Geopolitics #XiJinping #TechWar #AIChips #Semiconductors #NationalSecurity #मराठी #आंतरराष्ट्रीयराजकारण #भूराजकारण Instagram #JensenHuang #NvidiaCEO #Trump #ChinaInfluence #USChina #GeopoliticsExplained #AIRace #ChipWar #WorldPolitics #MarathiNews #मराठीबातम्या #जागतिकराजकारण #चीन

Открыть в Telegram
Просмотры321−46%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—

Все посты

Связи