चालू घडामोडी वन लायनर्स - 22 सप्टेंबर 2026 ◾20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ला जपानमधील आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे सुरुवात झाली, जपान तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमान आहे. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 चा शुभंकर होनो-होनो (Hono-Hono) आहे. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या उद्घाटन समारंभात पवन सेहरावत व मनू भाकर हे भारताचे ध्वजवाहक होते. ◾पुनर्गठित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती झाली. ◾99 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (Academy Awards 2027) संतोष दावकर दिग्दर्शित मराठी चित्रपट "गोंधळ" हा भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला. ◾आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी 21 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "Invest in Peace, for Everyone, Everywhere, Every Day" आहे. ◾पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्सने भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारे रेल्वे इंजिन (लोकोमोटिव्ह 39642) तयार केले. ◾बिमस्टेक (BIMSTEC) पारंपरिक औषध परिषद गोवा येथे झाली. ◾लेह (लडाख) येथे 10,600 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच ट्विन फ्लॉवर फील्ड (Twin Flower Field) तयार करण्यात आले. ◾क्यूएस ग्लोबल एमबीए क्रमवारी 2027 (QS Global MBA Rankings) मध्ये आयआयएम बेंगळुरू जगात 64 व्या स्थानी असून भारतात पहिल्या स्थानी आहे. ◾आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिन सप्टेंबरच्या तिसऱ्या शनिवारी (2026 मध्ये 19 सप्टेंबर) साजरा झाला. ◾आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या (International Cooperative Alliance) अॅट-लार्ज संचालकपदी दिलीप संघानी यांची निवड झाली. ◾अमेरिका व जॉर्डन यांच्यातील ईगर लायन 2026 हा लष्करी सराव अमेरिकेतील फोर्ट कार्सन (कोलोरॅडो) येथे झाला. ◾जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2029 नैरोबी (केनिया) येथे होणार आहे. ◾कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) व इंडी इव्हेंट्स दुबई यांच्यात भारताला गल्फूड 2027 (Gulfood) चा अधिकृत भागीदार देश बनवण्यासाठी सामंजस्य करार झाला ◾संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालकपदी ल्यूक जे. लिंडबर्ग यांची नियुक्ती झाली, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिलेल्या सिंडी मॅक्केन (Cindy McCain) यांची जागा घेतली. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत (2024) "आर्टिकल 370" हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, पुरस्कार वितरण 22 सप्टेंबर 2026 रोजी एकता नगर (गुजरात) येथे झाले. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "आर्टिकल 370" साठी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या, तर ममूटी (ब्रह्मयुगम) व कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "अमरन" साठी राजकुमार पेरियासामी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले, तर "स्वातंत्र्यवीर सावरकर" साठी रणदीप हुड्डा यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "कल्की 2898 एडी" ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ◾भारत व श्रीलंका यांच्या नौदलांमधील 13 वा द्विपक्षीय सागरी सराव स्लाइनेक्स-26 - 17 ते 21 सप्टेंबर 2026 दरम्यान विशाखापट्टणम येथे झाला. ◾ग्रीनलँडमध्ये अमेरिकेची सुरक्षा व लष्करी उपस्थिती वाढवण्यासाठी अमेरिका, डेन्मार्क व ग्रीनलँड यांच्यात करार झाला, मात्र यामुळे ग्रीनलँडची मालकी अमेरिकेकडे गेलेली नाही. ◾जागतिक अल्झायमर दिन दरवर्षी 21 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "The Earlier You Know, The More You Can Do: A Diagnosis Matters" आहे. ◾राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 19 व 20 सप्टेंबर 2026 रोजी विज्ञान भवन (नवी दिल्ली) येथे पर्यावरण व हवामानविषयक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली, तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. .◾आदि किसान कार्बन कार्यक्रमांतर्गत पंजाब व हरियाणातील 2,550 लहान व सीमांत शेतकऱ्यांना देशातील पहिले मृदा कार्बन थेट पेमेंट पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथे देण्यात आले. ◾कर्नाटक मंत्रिमंडळाने दक्षिण कन्नड व उडुपी जिल्ह्यांत तुळू भाषेला अतिरिक्त अधिकृत भाषेचा दर्जा दिला. ◾सिक्कीममधील भूस्खलनानंतर अडकलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू राबवले. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक
Открыть в Telegram
चालू घडामोडी वन लायनर्स - 22 सप्टेंबर 2026
Просмотры26 389+65%к среднему
Пересылки225
Реакции113
Комментарии—
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 53 ч | 25 036 |
| 57 ч | 25 065 |
| 61 ч | 25 155 |
| 65 ч | 25 910 |
| 69 ч | 26 389 |
- Всего сейчас26 389
Ссылки и упоминания
Реакции
- ❤104
- 🫡4
- 🔥3
- 👍2
Ещё посты канала चालू घडामोडी 2026
- 01Просмотры27,7 тыс.Пересылки177Реакции4Комментарии—
- 02Просмотры25,7 тыс.Пересылки167Реакции90Комментарии—
- 03Просмотры24,9 тыс.Пересылки145Реакции4Комментарии—
- 04Просмотры23,3 тыс.Пересылки128Реакции23Комментарии—
- 05Просмотры22,7 тыс.Пересылки56Реакции4Комментарии—