Account

Posts of STI VIKAS WANVE ✨

newest first

#545File
Views1,880−77%vs avg
Forwards—
Reactions7
Comments—
#544Text

प्रमुख सांख्यिकी संस्था 1. CSO (केंद्रीय सांख्यिकी कार्यालय) स्थापना : 2 मे 1951 (CSI स्थापना) ➔ 1954 (CSO रूपांतर) ➔ 1955 (प्रत्यक्ष कार्य सुरू). मुख्यालय: नवी दिल्ली (औद्योगिक सांख्यिकी विंग: कोलकाता). प्रमुख कार्य: राष्ट्रीय उत्पन्न (GDP) व बचतीचे अंदाज मोजणे, सांख्यिकीय मानके ठरवणे आणि समन्वय साधणे. प्रमुख प्रकाशने: NAS, ASI, IIP आणि CPI 2. NSSO (राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय) स्थापना : 1950 (NSS स्थापना) ➔ मार्च 1970 (NSSO पुनर्रचना) 4 प्रमुख विभाग: 1) डाटा प्रोसेसिंग – कोलकाता 2) सर्वे डिझाईन व रिसर्च – कोलकाता 3) समन्वय व प्रकाशन – नवी दिल्ली 4) फिल्ड ऑपरेशन्स – नवी दिल्ली व फरिदाबाद प्रमुख कार्य: सामाजिक-आर्थिक नमुना सर्वेक्षण (रोजगार, दारिद्र्य) आणि दर 5 वर्षांनी उपभोग खर्चाचे पंचवार्षिक सर्वेक्षण करणे. प्रमुख प्रकाशन: 'सर्वेक्षण' (Sarvekshana) – द्वैवार्षिक जर्नल 3. NSO (राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय) स्थापना: 23 मे 2019 (CSO आणि NSSO चे विलीनीकरण) मंत्रालय: MoSPI (सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय) अंतर्गत कार्यरत प्रमुख कार्य: देशातील राष्ट्रीय स्तरावरील सांख्यिकीय डेटा संकलन व सर्वेक्षणाचे एकत्रीकरण करून GDP, महागाई आणि रोजगाराची अचूक आकडेवारी देणे. 4. NSC (राष्ट्रीय सांख्यिकी आयोग) स्थापना: 12 जुलै 2006 (स्वायत्त आयोग) शिफारस: रंगराजन आयोग (स्थापना: जानेवारी 2000 | अहवाल: ऑगस्ट 2001) अध्यक्ष पात्रता व कार्यकाल: पद: अंशकालीन (Part-time) किमान वय: 55 वर्षे कार्यकाल: 3 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे (जे आधी घडेल ते) अध्यक्ष क्रम: 1) पहिले अध्यक्ष: प्रा. सुरेश तेंडुलकर (2006) 2) फेब्रुवारी 2013: डॉ. प्रणब सेन 3) 18 जून 2026 पासून: डॉ. सैबल चटोपाध्याय प्रमुख कार्य: अधिकृत आकडेवारीची गुणवत्ता, अचूकता आणि विश्वासार्हता टिकवणे, राष्ट्रीय सांख्यिकीय मानके व धोरणे निश्चित करणे आणि सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधणे. Join 👇 https://t.me/stivikaswanve

Open in Telegram
Views2,220−73%vs avg
Forwards—
Reactions15
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
20 h2,130
24 h2,220
  1. After 24 hours2,220
  2. Total to date2,220
#542Photo
Views3,440−58%vs avg
Forwards—
Reactions13
Comments—
#541File
Views6,370−23%vs avg
Forwards—
Reactions16
Comments—
#540Photo
Views7,050−14%vs avg
Forwards—
Reactions13
Comments—
#529File
Views9,070+10%vs avg
Forwards—
Reactions15
Comments—
#527File
Views9,860+20%vs avg
Forwards—
Reactions15
Comments—
#516File
Views13,200+61%vs avg
Forwards—
Reactions20
Comments—
#513Text

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण इंग्रजी Vocabulary ची तयारी कशी करावी याविषयी पोस्ट टाकली होती,त्यानंतर भरपूर जणांचे Msg आले की Passage बद्दल तुमची strategy सांगा.त्यामुळे मी आयोगाचा पेपर सोडवताना पॅसेज संबंधी काय करायचो हे इथे बघूया.त्या अगोदर एक सूचना, इथे तज्ज्ञ मंडळी खूप आहे त्यामुळे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात, तुम्हाला सोयीस्कर काय वाटते त्यानुसार निर्णय घ्या.इथे मी स्वतः ज्या गोष्टी Follow केल्या होत्या त्याविषयी बोलूया. एमपीएससी संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पेपर 1 मध्ये उतारा (Passage) हा अत्यंत महत्वाचा आणि गुण मिळवून देणारा भाग आहे.वेळेचे अचूक नियोजन आणि योग्य पद्धत वापरल्यास आपल्याला यामध्ये पैकीच्या पैकी किंवा जास्तीत जास्त गुण मिळवू शकता.यासाठी तयारी कशी करायला हवी आणि पेपरमधील नियोजन कसे असावे,याविषयी इथे थोडक्यात बघूया. विद्यार्थ्यांद्वारे सर्वात प्रामुख्याने विचारला जाणारा प्रश्न की passage नेमका कधी सोडवावा?  मी पेपरमधील मराठी व्याकरण सोडवून झाल्यानंतर लगेच Passage सोडवायला घ्यायचो.यासाठी काही मिनिटे वेळ राखून ठेवलेला असायचा.हे सोडवून झाल्यावर मग इंग्रजीचे व्याकरण & शब्दसंग्रह (Vocabulary) सोडवायचो.मला वाटते की कधीही passage सोडवताना तो साधारणपणे पेपरच्या मध्यभागात किंवा शेवटच्या 15-20 मिनिटांपूर्वी सोडवायला हवा. तो सुरुवातीलाच का सोडवू नये? तर पेपर सुरू झाल्यावर आपला मेंदू पूर्णपणे स्थिर होण्यास 5-10 मिनिटे लागतात. सुरुवातीलाच मोठा उतारा वाचायला घेतल्यास वेळ जास्त लागू शकतो आणि दडपण येऊ शकते तसेच एकदम शेवटी पण का सोडवू नये? जर अगदी शेवटच्या 10 मिनिटांत उतारा सोडवायला घेतला, तर वेळेच्या घाईमुळे उतारा नीट समजत नाही आणि सोपे प्रश्नही चुकतात. जे शेवटी पॅसेज सोडवतात त्यांना हा अनुभव आला असेल. पॅसेज वाचतांना स्वतःचे ज्ञान बाजूला ठेवून लेखकाचा दृष्टिकोन काय आहे ते ओळखून Passage ची Active Reading करायला पाहिजे.यामध्ये पहिल्या दोन-तीन ओळी आणि शेवटच्या दोन-तीन ओळी या खूप महत्त्वाच्या असतात. तिथेच लेखकाचा मुख्य उद्देश लपलेला असतो. त्यानंतर पुन्हा एक अती महत्वाचा प्रश्न विचारल्या जातो की अगोदर प्रश्न वाचावे की पूर्ण Passage? तर मला वाटते की यासाठी आपण Reverse Strategy वापरायला हवी.ज्यानुसार आपण नेहमी अगोदर प्रश्नच वाचायला हवे. ते वाचतांना उताऱ्याखाली दिलेले 4-5 प्रश्न फक्त 1 मिनिटात वर-वर वाचून घ्यायचे यामध्ये पर्याय वाचण्याची गरज नाही.यामुळे प्रश्न वाचताना आपल्या मनात काही 'Keywords' जसे की विशिष्ट संकल्पना, नाव किंवा कारण तयार होतील.यानंतर आपण जेव्हा उतारा वाचायला घेऊ तेव्हा आपले मन त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आधीच तयार असेल.उताऱ्यात तो विशिष्ट कीवर्ड दिसताच आपले लक्ष तिथे जाते आणि लगेच उत्तर सापडते.याप्रमाणे आपण पॅसेजची तयारी करायला पाहिजे, पॅसेजमध्ये स्कोअर कसा वाढवायचा, जास्तीत जास्त उत्तर कसे बरोबर आणायचे, त्यासाठी काय करायला पाहिजे व इतरही अनेक प्रश्न आहेत त्याविषयी लवकरच पोस्ट टाकूया. Join 👇 https://t.me/stivikaswanve

Open in Telegram
Views12,900+57%vs avg
Forwards—
Reactions54
Comments—