♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in Telegram
SpardhaGram
SpardhaGram - स्पर्धाग्राम स्पर्धाग्रामचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल. फोल्लो करा: फेसबुक- fb.com/SpardhaGram इन्स्टाग्राम- instagram.com/SpardhaGram Contact: 9604020277
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 8, 2026 | 957 |
| Nov 20, 2026 | 807 |
| Nov 21, 2026 | 805 |
| Nov 23, 2026 | 550 |
| Nov 24, 2026 | 472 |
| Nov 25, 2026 | 302 |
Most viewed this month
- 01Views957Forwards—Reactions—Comments—
- 02Views860Forwards—Reactions—Comments—
- 03Views814Forwards—Reactions—Comments—
- 04Views805Forwards—Reactions—Comments—
Latest posts
जाहिरात क्रमांक ०९०/२०२२ अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्य सेवा गट ब - मुलाखत कार्यक्रम
Open in TelegramHARIMAU SHAKTI–VI संयुक्त लष्करी सराव 👉 सहभागी देश: भारत आणि मलेशिया 👉 आवृत्ती: 6 वी 👉 सुरुवात: 19 नोव्हेंबर 2026 👉 कालावधी: 19 ते 30 नोव्हेंबर 2026 👉 ठिकाण: इपोह (Ipoh), मलेशिया 👉 सहभागी सैनिक: दोन्ही देशांचे प्रत्येकी 120 सैनिक
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाबाबत शुध्दीपत्रक
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शिल्प निदेशक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शुध्दीपत्रक
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्चितीबाबत शुध्दीपत्रक
Open in TelegramMPSC चालू घडामोडी: 25 ऑक्टोबर 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌾 महाराष्ट्रात 'मिशन मुरघास' आणि 'मागेल त्याला मुरघास' उपक्रम सुरू 🌾 राज्यातील ३०५ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 'मिशन मुरघास' हे राज्यव्यापी अभियान सुरू केले. 💰 उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे (मका, ज्वारी, नेपिअर गवत) शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये (Silage) रूपांतर करण्यासाठी २०२६-२७ च्या खरीप हंगामातील ५१.२० कोटी रुपयांच्या निधीव्यतिरिक्त ७६.४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. 🐄 विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये 'मागेल त्याला मुरघास' योजनेअंतर्गत पशुपालकांना मुरघास खरेदीवर प्रति किलो ३ रुपये अनुदान (प्रति पशु दररोज ५ किलोच्या हिशोबाने ९० दिवसांसाठी थेट बँक खात्यात - DBT) दिले जाणार आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🧪 मुंबईत १४ व्या 'इंडिया केम २०२६' (India Chem 2026) परिषदेचा समारोप 🧪 रसायने व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील १४ व्या द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचा २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत समारोप झाला. 📍 Place: मुंबई (भागीदार देश: जपान) 🎯 Theme: “Advantage Bharat: An Emerging Global Chemicals Hub” ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏅 ५ व्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप: भारताची विक्रमी ११४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी 🏅 जपानमधील आयची-नागोया येथे १८ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या ५ व्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेचा (5th Asian Para Games 2026) २४ ऑक्टोबर २०२६ रोजी समारोप झाला असून, भारताने विक्रमी ११४ पदकांसह (३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य) पदकतालिकेत ऐतिहासिक चौथे स्थान पटकावले. 🎯 Theme: “Imagine One Heart” (अधिकृत घोषवाक्य) 🏆 अंतिम पदकतालिकेत चीनने पहिल्या (४३५ पदके - २०७ सुवर्ण), जपानने दुसऱ्या (१८६ पदके - ६४ सुवर्ण) आणि उझबेकिस्तानने तिसऱ्या (१४५ पदके - ४५ सुवर्ण) क्रमांकावर स्थान मिळवले. भारताने सर्वाधिक ६५ पदके पॅरा-ॲथलेटिक्समध्ये (२२ सुवर्ण) आणि १६ पदके पॅरा-बॅडमिंटनमध्ये जिंकली. ✅ महाराष्ट्रातील प्रमुख सुवर्णपदक विजेते – दिलीप महादू गावित (१०० मी. T47) आणि सचिन सर्जेराव खिलारी (गोळाफेक F46). ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌫️ दिल्ली-NCR साठी जगातील पहिल्या एकात्मिक वायुप्रदूषण विश्लेषण प्रयोगशाळेचे (AATAL) उद्घाटन 🌫️ केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली-NCR साठी जगातील पहिल्या एकात्मिक वायुप्रदूषण विश्लेषण प्रयोगशाळेचे 'AATAL' (Integrated Atmospheric Chemistry and Aerosol Toxicity Analysis Laboratory) उद्घाटन केले. 🔬 'मिशन मौसम' (Mission Mausam) अंतर्गत उभारलेल्या या प्रयोगशाळेतील उपकरणांचा अंदाजित खर्च सुमारे ७९.५ कोटी रुपये आहे. ही प्रयोगशाळा 'AIRWISE' (Air Quality Warning and Integrated Decision Support System for Emissions) प्रणालीशी संलग्न असून, PM 2.5 व विषारी घटकांचे रासायनिक विश्लेषण करून प्रदूषणाचे नेमके स्रोत (वाहतूक, उद्योग, बायोमास ज्वलन, धूळ) रिअल-टाइममध्ये शोधण्यास सक्षम आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🚂 स्वातंत्र्यानंतर प्रथमच मध्य प्रदेशातील 'सीधी' जिल्हा रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला 🌟 ६५ कि.मी. लांबीच्या रीवा–चुरहट रेल्वे मार्गामुळे मध्य प्रदेशातील 'सीधी' (Sidhi) हा जिल्हा स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला असून, या प्रकल्पांतर्गत 'देवेंद्र नगर–चुरहट' ही नवीन रेल्वे सेवाही सुरू करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi
Open in Telegram*📅 MPSC चालू घडामोडी: 23 ऑक्टोबर 2026** ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏹 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी 🏹 पॅरा तिरंदाज शीतल देवी हिने वैयक्तिक प्रकारात सलग दुसऱ्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक राखले. तसेच तोमन कुमारसोबत कंपाउंड मिश्र सांघिक प्रकारातही सुवर्णपदक जिंकले. 🥇 अंजनाबेन: महिलांच्या ४०० मीटर धावणे (T47) प्रकारात सुवर्णपदक. 🥇 सुवर्णा राज: महिलांच्या थाळीफेक (Discus Throw F54) प्रकारात सुवर्णपदक. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌾 देशव्यापी 'खेत बचाओ अभियान 🌾 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील तरावडी (Taraori) येथून देशव्यापी 'Khet Bachao Abhiyan – Rabi 2026' सुरू केले. 🌱 या अभियानात संतुलित खतवापर, मृद्आरोग्य आणि शाश्वत शेती याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏗️ विदर्भातील रस्ते प्रकल्पांमध्ये ६.१७ कोटी टन राखेचा वापर 🏗️ विदर्भातील तीन द्रुतगती महामार्ग आणि एका खनिज वाहतूक मार्गाच्या उभारणीसाठी औष्णिक वीज केंद्रांमधील सुमारे ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा (Fly Ash) वापर करण्याची योजना आहे. 🌱 नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्गांसह नवेगाव मोरे-सुरजागड खनिज वाहतूक मार्गासाठी राखेचा वापर प्रस्तावित आहे. हा उपक्रम पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा विकास आणि राखेची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🐅 बीडच्या नायगाव मयूर अभयारण्यात वाघाचे दर्शन* 🐅 बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या नायगाव मयूर अभयारण्य परिसरात वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात २२ ऑक्टोबर २०२६ रोजी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची नोंद झाली आहे. 🦚 बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्य हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi
Open in TelegramConnections
Similar channels
🔰 Current Affairs Marathi 🔰@chalughadamodiEducation118K
My Handwritten Notes@myhandwrittennotesEducation13K
Prashant Jain Official: Unacademy@pjsir42Education13.1K
Reasoning by Rahul sir@reasoningbyrahulmishraEducation13.1K- FMGE Dec 2026@fmge_preparationEducation13.2K
Beats For Biology@beatsforbiologyEducation13.2K- CA Final IDT Ramesh Soni@carameshsoniEducation12.6K
- Life of 64 squares : UPSC, Chess and more.@rahulsri064Education12.5K