Account

Posts of प्रेरणादायी विचार

newest first

#1882Text

--- ### *असंच... मनाविषयी*. मन कुठं असतं? हृदयात की मेंदूत? की तो नुसताच एक आभास आहे? हा प्रश्न जितका वैज्ञानिक आहे, तितकाच तात्त्विक आणि काव्यमयही आहे. *मनाचं घर कुठं?* खरं तर मनाचे सगळे खेळ मेंदूतच चालतात. विचार, भावना, आठवणी, निर्णय - यांचा उगम मेंदूमध्ये होतो. पण त्याची खळबळ मात्र हृदयात उमटते. ठोके कमी-जास्त होतात. हृदय विचार करू शकत नाही, ते फक्त रक्त पंप करतं. मेंदूत घडणाऱ्या घटनांना ते ठोक्यांच्या माध्यमातून प्रतिसाद देतं. *मन विरुद्ध मेंदू* मन आणि मेंदूचा झगडा सदैव सुरूच असतो. मन प्रामाणिक आणि इनोसंट असतं, तर मेंदू काहीसा व्यवहारी, धूर्त असतो. एखाद्याने आपल्याला फसवलं की मेंदू सांगतो, "आता त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस." पण मन म्हणतं, "जाऊ दे ना! कदाचित त्याची काहीतरी अडचण असेल!" मग अशा वेळी ऐकायचं कुणाचं? गंमत म्हणजे दोघेही आपलेच असतात, पण दोघांचं एकमत कधीच होत नाही! मेंदू म्हणतो, "व्यवहार बघ!" मन म्हणतं, "भावना बघ!" मेंदू म्हणतो, "फायदा काय?" मन म्हणतं, "समाधान काय?" मनाने मेंदूचं आणि मेंदूने मनाचं ऐकलं, तर माणूस महात्मा होऊ शकतो. मग मन भरकटणार नाही आणि मती कुंठित होणार नाही. *मन - चंचल माकड* मन माकडासारखं असतं. ते सारखं या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत राहतं. आपण एकाचवेळी मेंदूच्या अनेक विंडोज ओपन करून ठेवतो आणि ब्रेन ओव्हरयूज करून झिजवून टाकतो. मग अतिविचाराने तो कामातूनच जातो. विचार, भावना आणि वर्तन यांची सांगड घातली की विवेक निर्माण होतो. जमीन काळीकसदार असावीच लागते, पण बी सुद्धा चांगलं लागतं. त्यासाठी मनात सतत चांगल्या विचारांची पेरणी करत राहावी लागते. कारण कुत्री, मांजरं, कपडे, भांडी, गाड्या धुण्याचे साबण निघालेत, पण घाण माणसाचं मन धुण्याचा साबण अजून निघालेला नाही. *बुद्धीचे चार स्तर* बुद्धीचे मेधा, मती, प्रज्ञा, ऋतंभरा असे वेगवेगळे स्तर आहेत. *मेधा* म्हणजे माहिती साठवणारी, लक्षात ठेवणारी प्राथमिक बुद्धी. *मती* म्हणजे बऱ्या-वाईटाची निवड करणारी, तर्क करणारी विश्लेषणात्मक बुद्धी. *प्रज्ञा* म्हणजे सखोल व सूक्ष्म अर्थ समजून घेणारी बुद्धी. आणि *ऋतंभरा* म्हणजे अंतिम सत्य जाणणारी सात्त्विक, दिव्य बुद्धी. समर्थ रामदास म्हणतात, "मन चंचल वारु, तयासी घालावा आवरु." पण धरिताही परि आवरेचि ना अशीच अवस्था होते. सगळ्यात वेगवान काय? तर ते असते आपले मन! ते कायम आपल्यापुढे दोन पावले असते. रण जिंकणं सोपं, पण मन जिंकणं कठीण! *मन असावं कुठं?* मन आपल्यासोबत असलं पाहिजे आणि आपण मनासोबत. मन कुठं असावं तर जिथं आपले पाय असतील तिथं. म्हणजे वर्तमानात! भूतकाळ हातातून निसटलेला असतो, भविष्य जन्मायचं असतं. जिवंत असतो तो वर्तमानाचा क्षण! वर्तमानाचा भूतकाळ होण्याआधी तो पकडता यायला हवा. त्यासाठी मनात जाता यायला हवं. म्हणतात ना, "जनात जा, वनात जा. पण कधीतरी आपल्या मनात जा." स्वतःचं स्वरूप कळणे हाच आनंद! शांतता, प्रेम, आनंद हा निसर्गाने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. स्वस्थ म्हणजे स्वतःत स्थित असणं. मन भटकत राहतं, आपणही भटकत राहतो. जेव्हा आपण ऑस्ट्रेलियात जातो तेव्हा इंडियाच्या गोष्टी करतो, आणि इंडियात आलो की ऑस्ट्रेलियाच्या गोष्टी करतो. अशीच गंमत असते. नेहमी मनासारखं सर्वकाही घडत नसतंच. त्यामुळे अधूनमधून उदास वाटतं. खरं तर उदास होणं हादेखील मनाचा अधिकारच आहे. ते सदैव खूश कसं राहू शकेल? ज्ञानेश्वरांसारख्या अलौकिक महात्म्याच्या जीवनातही औदासिन्य आले होते. तेही उदास होऊन ताटी लावून बसलेच होते. तिथं आपण कोण! तेव्हा मुक्ताई म्हणाली, "संत जेणे व्हावे जग बोलणे साहावे... मन मारुनी उन्मन करा... तुम्ही तरुनी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा." मन उन्मन होणे म्हणजे संकल्प-विकल्पापासून मुक्त होऊन शांत होणे. एक प्रकारची विचारशून्यता, स्थितप्रज्ञता, अमन अवस्था प्राप्त होणे. *60,000 विचार आणि उपाय* विचारामागून विचार असे साधारणतः एका दिवसात साठ हजार विचार येऊन जातात मेंदूत. आपण सर्वात जास्त स्वतःशीच बोलत असतो. पण मनात येणाऱ्या या विचारांकडे आपल्याला पाहता यायला हवं. टेरेसवर उभं राहून खाली गल्लीतून जाणारी वरात पाहतो तसं! मग अलिप्तपणे त्यांची निवड करता येते. नकारात्मक-सकारात्मक अशी पारख करता येते. मनात येणारे बहुतेक विचार नकारात्मक आणि शिळेच असतात. त्यामुळे मन ताजे ठेवण्यासाठी ते बाजूला करावे लागतात. त्यासाठी पर्याय द्यावा लागतो. तसे ते हटत नाहीत. सकारात्मक काही आठवावे लागते. सूर्याचं लालिमा घेऊन उगवणं, कळीचं फूल होणं, वाऱ्याची झुळूक येणं... निसर्गातील प्रत्येक गोष्ट विलोभनीय असते. मनाला सकारात्मक दिशा देण्यासाठी स्मृतीतलं असं काही छान तिथं टाकावं.

Open in Telegram
Views214−48%vs avg
Forwards—
Reactions6
Comments—
#1872Text

*एक फोन कारण नसतानाचा!* काल रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत जागाच होतो. तसं जागण्याचं काही खास कारण नव्हतं. झोप येत नव्हती म्हणून सहज मोबाईल हातात घेतला आणि कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली. नावं स्क्रोल करत राहिलो… एक, दोन, दहा, शंभर… आणि अचानक लक्षात आलं— मोबाईलमध्ये जवळपास 1570 कॉन्टॅक्ट्स आहेत! अचानक एक गोष्ट लक्षात आली… क्षणभर थांबलो आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला या सात हजार लोकांपैकी आपण रोज किती जणांना फोन करतो? काही मोजकेच… आणि आपल्याला फोन करणारे? तेही काही मोजकेच. मग दुसरा विचार मनात आला… या सात हजार लोकांपैकी असे किती लोक आहेत, ज्यांना आपण कोणत्याही कारणाशिवाय फोन करतो? उत्तर जवळजवळ शून्य होतं. आपण फोन करतो, पण एखादं कारण असतं म्हणून… काम असतं म्हणून… काही विचारायचं असतं म्हणून… काही मदत हवी असते म्हणून… किंवा एखादी गरज असते म्हणून. पण फक्त एवढ्यासाठी? काय रे, सहज फोन केला… कसा आहेस?” यासाठी किती जणांना आपण फोन करतो? कदाचित कुणालाच नाही. आणि मग मनात एक सुंदर विचार आला… आपल्याला जेव्हा थोडा रिकामा वेळ मिळेल, तेव्हा रोज फक्त पाच-दहा आपल्या जवळच्या माणसांना फोन केला तर? कसलंही कारण नको. कसलंही काम नको. फक्त फोन करून विचारायचं— “काय म्हणतोस?” “कशी आहेस?” “सगळं ठीक आहे ना?” “आज अचानक तुझी आठवण आली म्हणून फोन केला.” इतकंच… कदाचित आपल्यासाठी तो फक्त दोन मिनिटांचा फोन असेल. पण समोरच्यासाठी? कदाचित त्या दिवसभरातला सगळ्यात सुंदर क्षण असेल. कदाचित तो माणूस दिवसभर कोणाशी मनापासून बोलला नसेल. कदाचित तो कुठल्यातरी चिंतेत असेल. कदाचित त्याला कोणीतरी आपलं आहे, अशी जाणीव हवी असेल. आणि अचानक त्याच्या मोबाईलवर आपला फोन येईल… “अरे, काय झालं?” “काही नाही रे… सहज फोन केला.” हे दोन शब्द किती मोठे असतात, हे कदाचित आपल्याला कधी जाणवतच नाही. कारण आजच्या जगात प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. फोन केला म्हणजे काम असेल. मेसेज केला म्हणजे काहीतरी हवं असेल. भेटायला बोलावलं म्हणजे काही कारण असेल. पण “काहीही कारण नाही, फक्त तुझी आठवण आली” हे ऐकायला मिळणं हीच किती मोठी भावना आहे! आपल्याला वाटतं नाती मोठ्या गोष्टींनी टिकतात. पण खरं तर नाती छोट्या छोट्या गोष्टींनी जिवंत राहतात. एखादा अचानक केलेला फोन… एखादा अनपेक्षित मेसेज… “जेवलास का?” “काय चाललंय आयुष्यात?” “खूप दिवस झाले बोललो नाही, म्हणून फोन केला.” “आज तुझी आठवण आली.” या छोट्या छोट्या गोष्टी समोरच्याला सांगतात— “तू अजूनही माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस.” आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायमची राहीलच असं नाही. काही लोक दूर जातील. काहींच्याशी वर्षानुवर्षे बोलणं होणार नाही. काही नाती काळाच्या ओघात फिकी पडतील. पण काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशी नातं टिकवण्यासाठी मोठ्या भेटीगाठींची गरज नसते. फक्त अधूनमधून एक फोन पुरतो. कदाचित म्हणूनच आजपासून एक छोटासा नियम करून पाहायला हरकत नाही— दररोज पाच माणसांना फोन करायचा. कामासाठी नाही. स्वार्थासाठी नाही. काही मागण्यासाठी नाही. फक्त त्यांच्या आयुष्यात आपली एक छोटीशी उपस्थिती जाणवून देण्यासाठी. कदाचित पाच मिनिटं बोलताना आपण त्यांच्या आयुष्यात काही बदल घडवणार नाही. पण त्यांच्या मनात एक भावना नक्की निर्माण करू शकतो— “माझी आठवण काढणारं कुणीतरी आहे.” आणि खरं सांगायचं तर… माणसाला आयुष्यात फार काही नको असतं. शेवटी प्रत्येकाला फक्त एवढंच वाटत असतं— आपण कोणाच्यातरी मनात आहोत. आपल्याला कोणीतरी आठवतं. आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत. म्हणून आज तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट उघडा. हजारो नंबर दिसतील. त्यातले पाच नंबर निवडा. आणि फोन करा. काही कारण नसताना… कदाचित तुमचा हा छोटासा फोन कुणाचं मन हलकं करेल, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणेल, कुणाला पुन्हा आपुलकीची जाणीव करून देईल… आणि कदाचित तुमच्याही मनाला एक वेगळंच समाधान मिळेल. कारण आयुष्य मोठ्या प्रसंगांनी सुंदर होत नाही… ते अशाच छोट्या, निस्वार्थी क्षणांनी सुंदर होतं. म्हणून… कधी कधी कारण नसतानाही फोन करा. कारण नात्यांना कारणांची नाही, आपुलकीची गरज असते. आणि हो… कदाचित तुमचा एक फोन कुणाच्या आयुष्यातला आजचा सर्वात सुंदर फोन असेल.

Open in Telegram
Views1,890+362%vs avg
Forwards—
Reactions16
Comments—
#1869Text

या जगात सगळ्यांना खूश ठेवणं अशक्य आहे.तुम्ही चांगलं काम केलं,प्रामाणिक राहिलात,स्वतःच्या तत्त्वांवर ठाम उभे राहिलात की काही लोकांना ते खटकतं.कारण त्यांच्या आतल्या कमतरता,असुरक्षितता आणि असमाधानाचं प्रतिबिंब म्हणजे तुमचं यश ठरतं.तेव्हा ते कारण शोधत नाहीत,थेट शत्रुत्व स्वीकारतात.बुद्धिमत्ता ही फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नसते;ती विचारांत,निर्णयांत आणि वागण्यात दिसते.जेव्हा तुम्ही शांतपणे,समजूतदारपणे गोष्टी हाताळता,तेव्हा काही लोकांना आपली मर्यादा जाणवते,आणि त्यातूनच मत्सर जन्माला येतो.तसंच चारित्र्य सुंदर असणं म्हणजे केवळ शब्दांत चांगलं असणं नाही,तर वागण्यात स्वच्छता असणं होय.प्रामाणिकपणा,निष्ठा आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं हे गुण अनेकांना सहन होत नाहीत.शत्रू असणं हे अपयशाचं नव्हे,तर यशाचं लक्षण असतं.कारण तुम्ही कोणाच्या तरी लक्षात आलात,कोणाच्या तरी अपेक्षांपेक्षा वर गेलात,म्हणूनच तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपलात.अशावेळी स्वतःवर शंका घेण्याऐवजी,स्वतःकडे अभिमानाने पाहायला शिका.लक्षात ठेवा,सूर्य उगवतो म्हणूनच सावल्या पडतात.सावल्या नसत्या तर सूर्याचं अस्तित्वच कळालं नसतं.म्हणूनच कारण नसलेले शत्रू भेटले,तर समजून घ्या तुमचं तेज वाढत चाललं आहे. _"मित्रांनो;काळजी घ्या. ..."

Open in Telegram
Views1,500+267%vs avg
Forwards—
Reactions17
Comments—
#1867Text
Views1,400+242%vs avg
Forwards—
Reactions8
Comments—
#1866Text

विचारांनी फाटक्या असलेल्या लोकांसोबत वाद घालत बसायचं नाही. शहाणपण सिद्ध करण्यासाठी मूर्खांच्या गर्दीत उभं राहावं लागत असेल,तर ते शहाणपण नसून स्वतःचाच अपमान करून घेत असतो आपण.कारण ज्यांची विचारसरणी भिकेला लागलेली असते,त्यांना कितीही मोठं सत्य दाखवलं,तरी ते स्वतःच्या अंधारालाच प्रकाश समजतात.काही लोकांशी वाद घालण्यात खरंच काहीच अर्थ नसतो.कारण समोरच्याला सत्य समजून घ्यायचंच नसेल,तर कितीही तर्क दिले तरी त्याचा उपयोग होत नाही.आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक चुकीच्या व्यक्तीला उत्तर देणं गरजेचं नसतं.कधी कधी शांत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो.आपल्याला कोण काय म्हणतंय यापेक्षा आपण कोण आहोत,आपली विचारसरणी काय आहे आणि आपली कर्मं काय सांगतात हे महत्त्वाचं असतं.ज्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत,त्यांना दुसऱ्यांच्या सत्याची किंमत कधीच कळत नाही.म्हणून अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं;काही उत्तरं वेळ आणि यश स्वतः देत असतात.शांत राहा,स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुणाच्याही पातळीवर उतरू नका. "मित्रांनो;काळजी घ्या. ...

Open in Telegram
Views1,630+299%vs avg
Forwards—
Reactions16
Comments—
#1865Text

_*तुमच्या आयुष्यात असा एक काळ नक्कीच येईल,जेव्हा काही लोकांना हा प्रश्न पडेल की,आपण तुमच्याशी चुकीचे वागलोच का?कारण काळ प्रत्येकाला त्याच्या कर्मांचे प्रतिबिंब नक्कीच दाखवतो. म्हणून कोणाच्या वागण्याने खचून जाऊ नका. शांत रहा आणि आपल्या मार्गावर निष्ठेने पुढे चालत रहा. कारण उत्तर शब्द देत नाहीत,उत्तर वेळ देतो. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याशी नेहमीच चांगली वागेल असे नाही. काहीजण आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात,मन दुखावतात आणि आपल्याला चुकीचे ठरवतात. अशावेळी त्यांच्या वागण्याने खचून जाण्यापेक्षा शांत राहणे महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक कर्माचा हिशोब निसर्ग योग्य वेळी नक्कीच घेतो. आपण कोणाला काय दिले,कोणाचे मन दुखावले किंवा कोणाला आधार दिला,याचे परिणाम प्रत्येकाला कधीतरी भोगावे लागतात. म्हणून दुसऱ्यांना उत्तर देण्यात आपला वेळ आणि मनःशांती वाया घालवू नका. आपले कर्म प्रामाणिक ठेवा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने निष्ठेने पुढे चालत राहा.आज तुमच्यावर अन्याय झाला असेल,पण उद्या वेळच तुमची बाजू जगासमोर मांडेल.शब्दांनी दिलेले उत्तर विसरले जाते,पण वेळेने दिलेले उत्तर आयुष्यभर लक्षात राहते.*_

Open in Telegram
Views1,310+220%vs avg
Forwards—
Reactions21
Comments—
#1863Text

शेवटी तुमच्या लक्षात येतं की तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही, UPSC च्या अभ्यासक्रमाचं दडपण कोणीही खऱ्या अर्थाने समजू शकत नाही, आणि रात्री उशिराच्या त्या शांत अभ्यासाच्या वेळी मनात डोकावणाऱ्या आत्म-शंकेवर दुसरं कोणीही मात करू शकत नाही. सुरुवातीला हा एकटेपणा जरी जड वाटत असला, तरी तीच तुमची सर्वात मोठी ताकद असते, कारण ज्या क्षणी तुम्ही बाह्य मान्यतेची किंवा मदतीची वाट पाहणं थांबवता, त्याच क्षणी तुम्ही तुमच्या नशिबावर पूर्ण नियंत्रण मिळवता. एखाद्या जिल्ह्याचे व्यवस्थापन करण्याच्या खूप आधी, तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे; कठीण दिवसांमध्ये स्वतःला माफ करायला आणि प्रेरणा कमी झाल्यावर शांतपणे आपली भूमिका ठामपणे मांडायला शिकले पाहिजे. एकांत स्वीकारा, तुमच्या शिस्तीवर विश्वास ठेवा, आणि लक्षात ठेवा की आरशात तुमच्याकडे पाहणारी व्यक्ती ही एकमेव आहे जिला आज LBSNAA मध्ये यशस्वी होण्यासाठी हजर राहण्याची गरज आहे. 🤍

Open in Telegram
Views1,450+255%vs avg
Forwards—
Reactions11
Comments—