चालू घडामोडी वन लायनर्स - 23 सप्टेंबर 2026

चालू घडामोडी 2026, @chalughadamodi2023

Open in Telegram
#102749Text

चालू घडामोडी वन लायनर्स - 23 सप्टेंबर 2026 ◾भारत व मंगोलिया यांच्यातील नोमॅडिक एलिफंट संयुक्त लष्करी सरावाची 🫡 18 वी आवृत्ती 21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026 दरम्यान पिथौरागड (उत्तराखंड) येथे सुरू झाली, 17 वी आवृत्ती 2025 मध्ये उलानबातर (मंगोलिया) येथे झाली होती. ◾संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रादरम्यान न्यूयॉर्क येथे झालेल्या P4M शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ◾संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राचे अध्यक्ष बांगलादेशचे खलील उर-रहमान असून 80 व्या सत्राच्या अध्यक्ष जर्मनीच्या ॲनालेना बेअरबॉक होत्या. ◾सुमारे 1,000 किमी मारक क्षमता व 50 किलो पेलोड क्षमता असलेल्या भारताच्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या हल्लेखोर ड्रोन "काल" (KAL) ची चाचणी पोखरण (राजस्थान) येथे झाली. ◾11 वा आयुर्वेद दिन 23 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर (महाराष्ट्र) येथे साजरा झाला, 2026 ची थीम "स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद" आहे. ◾मार्च 2025 च्या राजपत्र अधिसूचनेनंतर आयुर्वेद दिन दरवर्षी 23 सप्टेंबर 🧘 या शरद संपात दिनी साजरा करण्याचे ठरले, यापूर्वी तो धनत्रयोदशीला साजरा होत असे. ◾भारतीय हवाई दलाच्या तरंग शक्ती ✈️ या बहुराष्ट्रीय हवाई सरावाची दुसरी आवृत्ती 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2026 दरम्यान जोधपूर हवाई तळावर (राजस्थान) होणार असून त्यात 40 हून अधिक देश सहभागी होतील. ◾युरोपियन आयोगाने 17 सप्टेंबर 2026 रोजी प्रस्तावित केलेल्या EU किड्स ॲक्ट अंतर्गत 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव आहे. ◾16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध लावणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश, यूएई हा पहिला अरब देश व इंडोनेशिया हा पहिला दक्षिण-पूर्व आशियाई देश ठरला. ◾9 वा भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 💧22 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान भारत मंडपम (नवी दिल्ली) येथे झाला, थीम "Climate Resilient Water Management" व भागीदार देश नेदरलँड्स आणि जर्मनी आहेत. ◾टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF 2026) 📽️ थेजा रिओ दिग्दर्शित नागालँडच्या पार्श्वभूमीवरील "Angh" या चित्रपटाला प्रतिष्ठेचा प्लॅटफॉर्म पुरस्कार मिळाला.या पुरस्कारामुळे "Angh" ला 2027 च्या ऑस्कर पुरस्कारांच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी थेट पात्रता मिळाली. ◾राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) पहिल्या जिल्हा-स्तरीय श्रमबाजार निर्देशकांच्या अहवालात 68.6% श्रमशक्ती सहभाग दरासह (LFPR) सुरत (गुजरात) पहिल्या स्थानी आहे. ◾स्वामित्व अधिकार अभिलेख निष्पादन एवं पंजीकरण योजना 2026 अंतर्गत मोफत ग्रामीण संपत्ती नोंदणी सुरू करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले, या उपक्रमाची सुरुवात 17 सप्टेंबर 2026 रोजी इंदूर येथे झाली. ◾17 वा कथकली महोत्सव 💃 18 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान चेन्नई (तमिळनाडू) येथे कलाक्षेत्र फाउंडेशनने आयोजित केला, त्याची थीम "कथा रस संगम" होती. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) प्रकारात महिलांच्या पारंपरिक 60 किलो गटात सुचिका तारियाल हिने कांस्यपदक जिंकले. ◾आशियाई क्रीडा स्पर्धेत एमएमए प्रकारातील 🤼 पदार्पणातच पदक जिंकणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. ◾वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरची (WWF) जागतिक संवर्धन परिषद 2026 🌿 चे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 21 सप्टेंबर 2026 रोजी जयपूर (राजस्थान) येथे केले. ◾जागतिक गेंडा दिन दरवर्षी 🦏 22 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "Keep the Five Alive" असून एकशिंगी गेंड्यांची सर्वाधिक संख्या भारतात, प्रामुख्याने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात (आसाम) आहे. ◾आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबरला साजरा होतो. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

Open in Telegram
Views25,714+73%vs avg
Forwards167
Reactions90
Comments—

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
28 h20,042
32 h20,168
36 h20,342
40 h21,650
44 h22,528
48 h23,338
52 h23,943
56 h23,984
60 h24,074
64 h24,951
69 h25,714
  1. After 24 hours20,042
  2. Total to date25,714

Reactions

  • ❤81
  • 🫡6
  • 🔥2
  • 👍1

More from चालू घडामोडी 2026

  1. 01

    चालू घडामोडी वन लायनर्स - 22 सप्टेंबर 2026 ◾20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ला जपानमधील आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे सुरुवात झाली, जपान तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमान आहे. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 चा शुभंकर होनो-होनो (Hono-Hono) आहे. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या उद्घाटन समारंभात पवन सेहरावत व मनू भाकर हे भारताचे ध्वजवाहक होते. ◾पुनर्गठित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती झाली. ◾99 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (Academy Awards 2027) संतोष दावकर दिग्दर्शित मराठी चित्रपट "गोंधळ" हा भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला. ◾आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी 21 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "Invest in Peace, for Everyone, Everywhere, Every Day" आहे. ◾पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्सने भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारे रेल्वे इंजिन (लोकोमोटिव्ह 39642) तयार केले. ◾बिमस्टेक (BIMSTEC) पारंपरिक औषध परिषद गोवा येथे झाली. ◾लेह (लडाख) येथे 10,600 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच ट्विन फ्लॉवर फील्ड (Twin Flower Field) तयार करण्यात आले. ◾क्यूएस ग्लोबल एमबीए क्रमवारी 2027 (QS Global MBA Rankings) मध्ये आयआयएम बेंगळुरू जगात 64 व्या स्थानी असून भारतात पहिल्या स्थानी आहे. ◾आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिन सप्टेंबरच्या तिसऱ्या शनिवारी (2026 मध्ये 19 सप्टेंबर) साजरा झाला. ◾आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या (International Cooperative Alliance) अ‍ॅट-लार्ज संचालकपदी दिलीप संघानी यांची निवड झाली. ◾अमेरिका व जॉर्डन यांच्यातील ईगर लायन 2026 हा लष्करी सराव अमेरिकेतील फोर्ट कार्सन (कोलोरॅडो) येथे झाला. ◾जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2029 नैरोबी (केनिया) येथे होणार आहे. ◾कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) व इंडी इव्हेंट्स दुबई यांच्यात भारताला गल्फूड 2027 (Gulfood) चा अधिकृत भागीदार देश बनवण्यासाठी सामंजस्य करार झाला ◾संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालकपदी ल्यूक जे. लिंडबर्ग यांची नियुक्ती झाली, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिलेल्या सिंडी मॅक्केन (Cindy McCain) यांची जागा घेतली. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत (2024) "आर्टिकल 370" हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, पुरस्कार वितरण 22 सप्टेंबर 2026 रोजी एकता नगर (गुजरात) येथे झाले. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "आर्टिकल 370" साठी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या, तर ममूटी (ब्रह्मयुगम) व कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "अमरन" साठी राजकुमार पेरियासामी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले, तर "स्वातंत्र्यवीर सावरकर" साठी रणदीप हुड्डा यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "कल्की 2898 एडी" ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ◾भारत व श्रीलंका यांच्या नौदलांमधील 13 वा द्विपक्षीय सागरी सराव स्लाइनेक्स-26 - 17 ते 21 सप्टेंबर 2026 दरम्यान विशाखापट्टणम येथे झाला. ◾ग्रीनलँडमध्ये अमेरिकेची सुरक्षा व लष्करी उपस्थिती वाढवण्यासाठी अमेरिका, डेन्मार्क व ग्रीनलँड यांच्यात करार झाला, मात्र यामुळे ग्रीनलँडची मालकी अमेरिकेकडे गेलेली नाही. ◾जागतिक अल्झायमर दिन दरवर्षी 21 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "The Earlier You Know, The More You Can Do: A Diagnosis Matters" आहे. ◾राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 19 व 20 सप्टेंबर 2026 रोजी विज्ञान भवन (नवी दिल्ली) येथे पर्यावरण व हवामानविषयक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली, तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. .◾आदि किसान कार्बन कार्यक्रमांतर्गत पंजाब व हरियाणातील 2,550 लहान व सीमांत शेतकऱ्यांना देशातील पहिले मृदा कार्बन थेट पेमेंट पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथे देण्यात आले. ◾कर्नाटक मंत्रिमंडळाने दक्षिण कन्नड व उडुपी जिल्ह्यांत तुळू भाषेला अतिरिक्त अधिकृत भाषेचा दर्जा दिला. ◾सिक्कीममधील भूस्खलनानंतर अडकलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू राबवले. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Text
    Views26.4K
    Forwards225
    Reactions113
    Comments—
  2. 02

    चालू घडामोडी वन लायनर्स - 25 सप्टेंबर 2026 ◾इटलीतील पोरपेटो येथे 12 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान झालेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप शॉटगन 2026 🎯 मध्ये तमिळनाडूच्या युगन शक्तिवेल मुथुकुमार याने पुरुष ट्रॅप प्रकारात 30 पैकी 27 हिट्ससह भारताचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. ◾ISSF ज्युनियर वर्ल्ड कप शॉटगन 2026 पदकतालिकेत इटली 6 पदकांसह पहिल्या स्थानी राहिला, तर भारत सायप्रस व स्पेनसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी राहिला.◾संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राची 🌐 थीम "Restoring Trust, Managing Transformation: A United Nations that Delivers for All" असून सर्वसाधारण चर्चा 22 ते 28 सप्टेंबर 2026 दरम्यान होत आहे. ◾भारत–श्रीलंका नौदल सराव SLINEX 🚢 ची 13 वी आवृत्ती 17 ते 21 सप्टेंबर 2026 दरम्यान विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झाली, 12 वी आवृत्ती 2025 मध्ये कोलंबो (श्रीलंका) येथे झाली होती. ◾भारताने 2030 पर्यंत लाळ्या-खुरकूत रोगमुक्त (FMD Free) 🐄 दर्जा मिळवण्याचे राष्ट्रीय लक्ष्य ठेवले असून पशुपालन व दुग्धव्यवसाय विभाग आणि जागतिक पशु आरोग्य संघटना (WOAH) यांची तीन दिवसीय कार्यशाळा नवी दिल्ली येथे झाली. ◾बिझनेस स्वीडनच्या ग्लोबल बिझनेस क्लायमेट सर्व्हे 2026 📊 मध्ये 41 बाजारपेठांपैकी भारत आयर्लंडसह संयुक्तपणे सर्वाधिक अनुकूल व्यावसायिक वातावरण असलेल्या देशांत पहिल्या स्थानी राहिला. ◾AIFF ची पहिली अंडर-15 महिला युवा लीग ⚽ 15 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्पोर्टिंग प्लॅनेट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बेळगावी (कर्नाटक) येथे होणार असून त्यात 16 संघ सहभागी होतील. ◾अमेरिकेचे ल्यूक लिंडबर्ग 🍞 यांची संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (WFP) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली, त्यांनी सिंडी मॅक्केन यांची जागा घेतली. ◾भारतातील पहिला समर्पित टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन 📡 ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे 350 एकरांवर उभारला जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी (170 एकर) केंद्राने ₹493 कोटी मंजूर केले आहेत. ◾9 व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 💧 चे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले, यात 14 राज्य भागीदार सहभागी असून 150 देशांना निमंत्रण देण्यात आले. ◾केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (CPCB) 🌿 52 वा स्थापना दिन 22 सप्टेंबर 2026 रोजी साजरा झाला, मंडळाचे अध्यक्ष अमनदीप गर्ग आहेत. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Text
    Views24.9K
    Forwards145
    Reactions4
    Comments—
  3. 03

    🤩 चालू घडामोडी वन लायनर्स - 24 सप्टेंबर 2026 ◾भारत -ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारांतर्गत (CEPA) व्यापार-संबंधित व्यवस्था 1 जून 2026 पासून लागू झाली असून भारतीय निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. ◾FAO ने "Forests for Food: Nourishing People, Sustaining the Planet" 🌳 हा अहवाल जारी केला, त्यानुसार जगातील 5 अब्जांहून अधिक लोक अन्न, उत्पन्न किंवा इतर गरजांसाठी जंगलांवर अवलंबून आहेत. ◾FAO अहवालानुसार सुमारे 1.8 अब्ज लोक स्वयंपाकासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात, तर मागील दशकात दरवर्षी सरासरी 10.9 दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट किंवा खराब झाले. ◾पृथ्वीपासून सुमारे 450 प्रकाशवर्षे अंतरावरील, 10 लाख वर्षांपेक्षा कमी वयाचा व गुरूइतके वस्तुमान असलेला Elias 224 b 🪐 हा आतापर्यंतचा सर्वात तरुण ज्ञात ग्रह ठरला. ◾सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रोजेक्ट विजयकचा 🛣️ 16 वा स्थापना दिन 21 सप्टेंबर 2026 रोजी कारगिल (लडाख) येथे साजरा झाला. ◾आंतरराष्ट्रीय शांतता दिन 🕊️ 21 सप्टेंबरला साजरा झाला, 2026 ची थीम "Invest in Peace, for Everyone, Everywhere, Every Day" आहे. ◾डॉ. सेतुरामन पंचनाथन 🏅 हे US National Academy of Engineering चा Arthur M. Bueche Award 2026 मिळवणारे पहिले भारतीय-अमेरिकन ठरले, पुरस्कार 4 ऑक्टोबर 2026 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे प्रदान होणार आहे. ◾तामिळनाडूच्या "थाईमामन थंगा मोथिरम" योजनेअंतर्गत 22 जून 2026 नंतर सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या पात्र नवजात बालकांना 1 ग्रॅमची 22 कॅरेट सोन्याची अंगठी दिली जाणार असून अंदाजित बजेट ₹755.83 कोटी आहे. ◾17 वा कथकली महोत्सव 💃 18 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान चेन्नई (तमिळनाडू) येथे कलाक्षेत्र फाउंडेशनने आयोजित केला. ◾38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, फेस्टिव्हल 14 ते 25 सप्टेंबर 2026 दरम्यान पुणे (महाराष्ट्र) येथे होत आहे. ◾रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) 🚆 42 वा स्थापना दिन 20 सप्टेंबर 2026 रोजी साजरा झाला. ◾जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांक 2026 मध्ये न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे. ◾10 वी जागतिक चक्रीय अर्थव्यवस्था परिषद ♻️ (WCEF 2026) 15 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान गांधीनगर (गुजरात) येथे झाली, दक्षिण आशियात प्रथमच आयोजित या परिषदेची थीम "Circular Economy Transition for People and Prosperity" होती. ◾महाराष्ट्राची वित्तीय स्थिती मजबूत करण्यासाठी प्रा. विजय केळकर 💰 यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समिती स्थापन करण्यात आली. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Text
    Views23.3K
    Forwards128
    Reactions23
    Comments—
  4. 04

    चालू घडामोडी वन लायनर्स - 26 सप्टेंबर 2026 ◾दिल्ली सरकारने महिला व तृतीयपंथी समुदायासाठी दुर्गा ई-ऑटो योजनेला मंजुरी दिली, पहिल्या टप्प्यात 1,300 पिंक इलेक्ट्रिक ऑटो चालवले जातील.यापैकी 1,170 ऑटो महिलांसाठी व 130 ऑटो तृतीयपंथी लाभार्थ्यांसाठी राखीव असतील. ◾2026 चा राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मान प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला, तो 28 सप्टेंबर 2026 रोजी लता मंगेशकर सभागृह, इंदूर (मध्य प्रदेश) येथे प्रदान केला जाणार आहे ◾भारतीय नौदल व फ्रेंच नौदलादरम्यानच्या वरुण या द्विपक्षीय सागरी सरावाची 24 वी आवृत्ती सप्टेंबर 2026 मध्ये झाली, त्यासाठी आयएनएस त्रिशूल 22 सप्टेंबर 2026 रोजी टूलॉन (फ्रान्स) बंदरात पोहोचली. ◾जागतिक फुप्फुस दिन (World Lung Day) दरवर्षी 25 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "A Lifetime of Lung Health" आहे. ◾नासाने विश्वाची निर्मिती व ग्रहांच्या उत्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी 1.2 अब्ज डॉलर खर्चाच्या प्राइमा या नव्या अंतराळ दुर्बिणीची घोषणा केली. ◾ब्रिटनने उपग्रहांच्या संरक्षणासाठी व अंतराळातील शत्रुत्वपूर्ण हालचालींना तोंड देण्यासाठी नंबर 3 स्पेस इफेक्ट्स स्क्वाड्रन ही आपली पहिली स्वतंत्र लष्करी अंतराळ तुकडी स्थापन केली, ती रॉयल एअर फोर्सच्या अंतर्गत काम करेल. ◾मिझोरामच्या लॉंगतलाई जिल्ह्यातील सांगाऊ गावातील महिला शेतकरी जे. टी. लालरिंथांगी यांची अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) 100 महिला नायिका पुरस्कारासाठी निवड झाली. ◾प्रीमियर एनर्जीजने आंध्र प्रदेशातील नायडुपेटा येथे भारतातील सर्वात मोठा 7 गिगावॅट क्षमतेचा सौर सेल निर्मिती प्रकल्प सुरू केला. ◾ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026 मध्ये 1,000 शहरांपैकी दिल्ली 268 व्या स्थानी असून ती भारतातील पहिल्या क्रमांकाची शहर ठरली. ◾ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स निर्देशांकात बेंगळुरू 311, मुंबई 323, चेन्नई 381 व हैदराबाद 421 व्या स्थानी असून न्यूयॉर्क पहिल्या, लंडन दुसऱ्या व पॅरिस तिसऱ्या स्थानी आहे. ◾परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 23 सप्टेंबर 2026 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथे भारत-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुरुची इंदर सिंग व कमलजीत या भारतीय जोडीने 484.6 गुणांसह आशियाई विक्रम करत सुवर्णपदक जिंकले.भारतीय नेमबाजी संघाचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक ठरले. ◾आशियाई क्रीडा स्पर्धेत 24 सप्टेंबर रोजी भारताच्या मिश्र 4x400 मीटर रिले संघाने रौप्यपदक जिंकले. ◾सीमा कुमारीने महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले (या प्रकारात भारताला 16 वर्षांनी पदक मिळाले) ◾प्रसिद्ध व्यवसाय रणनीतीकार हिरव शाह यांनी लिहिलेली "सारथी" (Sarathi) ही व्यावसायिक कादंबरी सप्टेंबर 2026 मध्ये प्रकाशित झाली. ◾मेक इन इंडिया 2.0 मध्ये 27 क्षेत्रांचा समावेश असून त्यापैकी 15 उत्पादन क्षेत्रे व 12 सेवा क्षेत्रे आहेत, यासाठीचे नोडल मंत्रालय वाणिज्य व उद्योग मंत्रालय आहे. ◾लोनली प्लॅनेटच्या "बेस्ट इन ट्रॅव्हल 2027" यादीतील पहिल्या 50 ठिकाणांत भारतातून गुजरात व दार्जिलिंग हिमालयन रेल्वे यांचा समावेश झाला. ◾भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व युरोपियन अंतराळ संस्था (ESA) यांनी आपला अंतराळ सहकार्य करार 2032 पर्यंत वाढवला. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Text
    Views22.9K
    Forwards150
    Reactions4
    Comments—
  5. 05
    Views22.1K
    Forwards58
    Reactions164
    Comments—

All posts of चालू घडामोडी 2026