Посты канала कृषिसेवक - पुणे विभाग
ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळणार · मदत व पुनर्वसन विभागाची माहिती · दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन संवेदनशील मुंबई, दि. २१ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर तसेच आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. पीक नुकसान, घटलेले उत्पन्न आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मदत देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या दुष्काळी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार मदत वितरित करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करणे आणि तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे निकाली काढणे यावर मदत व पुनर्वसन विभागाचा भर आहे. अशा प्रकरणांची छाननी करून निर्धारित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ३१० तालुके दुष्काळग्रस्त घोषित राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आणखी सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० झाली आहे. या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्धारित निकषांनुसार मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत ॲग्रीस्टॅक प्रणालीवर राज्यातील सुमारे १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी होऊन त्यांना फार्मर आयडी देण्यात आला आहे. यापैकी सुमारे ९४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. ही मदत शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२६ आणि पीक नुकसानीसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार वितरित करण्यात येत आहे. मदतीचे वितरण निश्चित निकषांनुसार पीक नुकसानीचे क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निर्धारित निकषांनुसार मदत देण्यात येत आहे. मदत वितरणापूर्वी शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी, नोंदींचे प्रमाणीकरण आणि पात्रतेची तपासणी करण्यात येते. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा केली जाते. आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे काही व्यवहार अयशस्वी झाले आहेत. तसेच वारस नोंदी, नावातील तफावत, प्रतिबंधित जमीन नोंदी आणि चुकीची अथवा विसंगत माहिती यामुळे काही फार्मर आयडींच्या पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत. अशा प्रकरणांची छाननी करून निर्धारित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जात आहे. गेल्या १५ दिवसांत चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नव्याने फार्मर आयडी प्राप्त केले आहेत. या शेतकऱ्यांच्या नोंदींची निर्धारित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार त्यांचाही मदतीसाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे फार्मर आयडी किंवा तांत्रिक कारणांमुळे मदत मिळण्यास विलंब झालेल्या प्रकरणांमध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाची कार्यवाही सुरू २८ ऑक्टोबर २०२६ मधील तरतुदीनुसार मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय लाभार्थ्यांची यादी आणि वितरित करण्यात आलेल्या मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. यामुळे मदत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यास मदत होणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करणे आणि तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे निकाली काढणे यावर मदत व पुनर्वसन विभागाचा भर आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाच्या निर्धारित धोरणानुसार मदत वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
Открыть в Telegram👩💻 *शेतकरी यांना स्वतः Agristack Profile मध्ये पुढील दुरूस्ती उपलब्ध आहेत.* mhfr.agristack.gov.in 📌या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी यांनी Farmer Login निवडावे (यापूर्वी नोंदणी झाली असता Forget Password -Role Farmer आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा Text Msg मध्ये ID व password प्राप्त होईल) 📌Farmer Login ने login झाल्यावर Home 1. Enrollment ID 2. Farmer Name 3. Farmer Enrollment Date 4. Farmer ID 5. Approval Status उपलब्ध आहे 📌 Check Enrollment Status मध्ये मान्यता Pending असल्यास तपशील दिसेल. 📌 Viwe My Information माहिती Download करिता उपलब्ध आहे 📌 Update My Information 1. KYC Details - KYC Verification 2. Land Ownership Details नविन शेती जोडणे किंवा शेती कमी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे तसेच मोबाईल क्रमांक व जात प्रवर्ग दुरुस्ती उपलब्ध आहेत शेतकरी यांना स्वतः Agristack Profile मध्ये पुढील दुरूस्ती उपलब्ध आहेत mhfr.agristack.gov.in 📌या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी यांनी Farmer Login निवडावे (यापूर्वी नोंदणी झाली असता Forget Password -Role Farmer आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा Text Msg मध्ये ID व password प्राप्त होईल) 📌Farmer Login ने login झाल्यावर Home 1. Enrollment ID 2. Farmer Name 3. Farmer Enrollment Date 4. Farmer ID 5. Approval Status उपलब्ध आहे 📌 Check Enrollment Status मध्ये मान्यता Pending असल्यास तपशील दिसेल. 📌 Viwe My Information माहिती Download करिता उपलब्ध आहे 📌 Update My Information 1. KYC Details - KYC Verification 2. Land Ownership Details नविन शेती जोडणे किंवा शेती कमी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे तसेच मोबाईल क्रमांक व जात प्रवर्ग दुरुस्ती उपलब्ध आहेत
Открыть в Telegramभूजल संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत जलनियोजनाला प्राधान्य देणे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक थेंबाचा जपून वापर करणे आवश्यक आहे. आज आपण जपलेले पाणीच उद्याच्या पिढ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा मंत्र प्रत्यक्ष कृतीत आणत भूजलाचा वापर मोजून, जपून आणि पुनर्भरण करून करणे गरजेचे आहे. – डॉ. मुश्ताक अहमद शेख, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सोलापूर
Открыть в Telegramजमिनीखालची बँक जपूया; भूजलाचा वापर काटकसरीने करूया! महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ मधून भूजल संरक्षण, पुनर्भरण आणि सामूहिक जलव्यवस्थापनाला कायदेशीर आधार "कमी पर्जन्यमान आणि वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यात शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भूजलावर अवलंबून आहे. मात्र, भूजलाचा बेसुमार उपसा आणि पुनर्भरणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे भूजलाचे संरक्षण, काटकसरीने वापर आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण ही काळाची गरज बनली आहे." भूजलाला जमिनीखालील बँक असे म्हणता येईल. पावसाळ्यात या बँकेत पाणी जमा होते आणि वर्षभर त्याचा वापर केला जातो. मात्र, पाण्याचा जमा होणारा साठा कमी आणि उपसा जास्त झाला तर ही बँक रिकामी होण्यास वेळ लागत नाही. महत्त्वाचे म्हणजे भूजलाचा साठा हा केवळ एका शेतकऱ्याचा नसून संपूर्ण गावाचा सामाईक स्रोत आहे. सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या काळ्या बेसाल्ट खडकात पाणी मोठ्या तळ्यासारखे साठत नाही. ते खडकातील भेगा, झिजलेले थर आणि सूक्ष्म छिद्रांमध्ये साठते. अशा खडकांची पाणी साठविण्याची क्षमता साधारण एक ते तीन टक्केच असते. त्यामुळे एखाद्या विहिरीतून किंवा बोअरवेलमधून सातत्याने पाणी उपसा केल्यास आजूबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीवरही परिणाम होतो. अधिक खोल बोअरवेल घेण्याची स्पर्धा हा यावरचा उपाय नसून त्यामुळे खर्च वाढतो आणि भूजलसाठा अधिक वेगाने संपतो. भूजल संरक्षणासाठी कायद्याचे बळ- भूजलाचा शाश्वत वापर आणि व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ लागू केला आहे. या कायद्याला २२ नोव्हेंबर २०१३ रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली असून, १ जून २०१४ पासून तो राज्यात लागू आहे. बेसुमार भूजल उपसा रोखणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणे, पाणी दूषित होण्यास प्रतिबंध करणे आणि लोकसहभागातून पाणलोट क्षेत्रनिहाय नियोजन करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. कायद्यानुसार अतिशोषित, शोषित किंवा पाणी दूषित झालेली क्षेत्रे शासनाकडून अधिसूचित करता येतात. अशा क्षेत्रांत विहिरींची नोंदणी आणि नवीन विहिरींच्या खोदकामावर तसेच पाणी उपशावर निर्बंध घालता येतात. गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत अधिसूचित केल्यानंतर त्याच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहीर खोदण्यास मनाई करण्याची तरतूद आहे. आवश्यकतेनुसार तांत्रिक अभ्यासाच्या आधारे हा परिसर वाढविताही येतो. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. दुष्काळात पाणी उपशावर निर्बंध- पाणीटंचाई निर्माण झाल्यास संबंधित क्षेत्र पाणीटंचाई क्षेत्र म्हणून घोषित करता येते. अशा वेळी जिल्हा प्राधिकरण म्हणून उपविभागीय अधिकारी भूजल उपशावर निर्बंध घालू शकतात. आवश्यकतेनुसार काही विहिरींचा उपसा तात्पुरता बंद करण्याचे अधिकारही आहेत. यामुळे उभ्या फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. अधिसूचित क्षेत्रात पाणलोट क्षेत्र जलसंपत्ती समिती स्थापन केली जाते. या समितीत ग्रामपंचायत, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, कृषी, जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागांचे प्रतिनिधी सहभागी असतात. समितीत किमान एकतृतीयांश सदस्य महिला असणे आवश्यक आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली गावाचा भूजल वापर आराखडा तयार करून दरवर्षी अद्ययावत केला जातो. यात अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांचे हित आणि पाण्याचे न्याय्य वाटप यांना प्राधान्य दिले जाते. पुनर्भरणातून भूजलसाठा वाढविण्याची गरज- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत पर्जन्यमान, भूजलपातळी, पाण्याचा उपसा, भूगर्भातील खडकांची रचना आणि पाण्याची गुणवत्ता यांचा अभ्यास केला जातो. पुनर्भरणासाठी योग्य जागा निश्चित करणे तसेच ग्रामपंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन करणे ही यंत्रणेची महत्त्वाची कामे आहेत. शेतकऱ्यांनी पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करावा. शेततळी, बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण आणि घराच्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासारखे उपाय करावेत. तसेच विहिरींच्या पाणीपातळीची दर महिन्याला नोंद ठेवावी. नवीन विहीर किंवा बोअरवेल खोदण्यापूर्वी आपला भाग अधिसूचित आहे का, याची ग्रामपंचायत किंवा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून माहिती घ्यावी. अधिसूचित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी कमाल १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पुन्हा उल्लंघन केल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा कमाल २५ हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Открыть в Telegram*🚨 शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! 🚨* *🌾 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठे बदल!* शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये यंदा अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे. 🔹 ०.१० हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र संरक्षित करता येणार नाही. 🔹 शेतकरी प्रमाणीकरण 🔹 सामाईक क्षेत्रासंबंधी नियम 🔹 अर्ज रद्द होण्याची शक्यता त्यामुळे पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घ्यावी. *📌 पीक विमा भरताना घ्यावयाची दक्षता* 1️⃣ पीक विमा भरण्यापूर्वी आपल्या शेतातील ई-पीक पाहणीमध्ये कोणत्या पिकाची नोंद आहे, याची खात्री करून घ्यावी. 2️⃣ सन २०२६ प्रमाणेच सन २०२७ मध्येही संभाव्य अल निनोच्या प्रादुर्भावाचा विचार करून हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक पेरणीचे नियोजन करावे. 3️⃣ पीक विमा केवळ बँकेत किंवा अधिकृत CSC केंद्रावरूनच भरावा. 4️⃣ ज्या CSC केंद्रावरून विमा भरत आहात, ते अधिकृत केंद्र आहे का आणि CSC VLE ID संबंधित केंद्रचालकाचाच आहे का, याची खात्री करावी. 5️⃣ पीक विमा भरल्यानंतर पावती घेताना त्यावर केंद्राचा शिक्का असल्याची खात्री करावी. 6️⃣ पीक विमा भरताना अनुभवी व तज्ञ CSC केंद्र चालकाकडूनच भरून घ्यावा. 7️⃣ कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे किंवा केंद्रावर पीक विमा भरू नये. 8️⃣ यावर्षी संबंधित शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण केल्यानंतरच पीक विमा अर्ज भरला जाणार आहे. त्यामुळे प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी! *⚠️ विशेष आवाहन* शेतकरी बांधवांनो, घाईगडबडीत पीक विमा भरू नका. अर्जातील क्षेत्र, पीक, आधार प्रमाणीकरण व इतर माहिती काळजीपूर्वक तपासूनच अर्ज अंतिम करा! *आपली एक छोटीशी चूक भविष्यात पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवू शकते!* 🌱 सावधान शेतकरी – सुरक्षित शेती! 🙏 ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा!
Открыть в Telegram♦️Qualification information 👇 ♦️Name of qualification 👇 👉(B.sc Agriculture) ❌ 👉B.sc करा ✅✅ ♦️Subject/stream/branch 👇 👉 Agriculture करा ✅✅ सर्वांना eligible दाखवेल !✅✅ Option show होत नव्हता काही जणांना आता प्रयत्न करा प्रॉब्लेम solve झालेला आहे !
Открыть в Telegram