Кабинет

Посты канала 𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

сначала новые

#4993Текст

Переслано из CHHAYA CLUB Nov 26

🟣 # DAY 13 | अभ्यास करताना प्रत्येक वेळी परिपूर्ण कामगिरीची अपेक्षा करणे तुम्हाला मागे तर खेचत नाही ना? अनेक विद्यार्थी अभ्यासाला बसताना स्वतःकडून अतिशय उच्च अपेक्षा ठेवतात. आजचा विषय पूर्णपणे समजला पाहिजे, प्रत्येक प्रश्न बरोबर सोडवला पाहिजे, नियोजनातील प्रत्येक तास उपयोगात आला पाहिजे. एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे झाली नाही की असमाधान निर्माण होते. मग अभ्यासाचा वेग कमी होतो, एखादे लक्ष्य अपूर्ण राहिल्याने पुढील नियोजन विस्कळीत होते आणि हळूहळू संपूर्ण दिवस खराब गेल्याची भावना निर्माण होते. परिपूर्णतेचा आग्रह आणि उत्कृष्टतेचा ध्यास यात फरक आहे. उत्कृष्टतेचा ध्यास तुम्हाला सुधारण्यासाठी प्रवृत्त करतो; परंतु परिपूर्णतेचा आग्रह अनेकदा चुका होण्याच्या भीतीत अडकवतो. मानसशास्त्रात Perfectionism या प्रवृत्तीचा अभ्यास करताना अवास्तव उच्च मानके, स्वतःच्या चुका स्वीकारण्यात अडचण आणि कामगिरीबद्दल अतिशय कठोर आत्ममूल्यांकन यांचा विचार केला जातो. MPSC च्या तयारीत याची अनेक उदाहरणे दिसतात. एखाद्या विद्यार्थ्याला एका दिवसात ठरवलेला अभ्यास पूर्ण झाला नाही, तर तो दुसऱ्या दिवसाचे लक्ष्यही अवास्तव वाढवतो. एखादे उत्तर अपेक्षेप्रमाणे लिहिता आले नाही, तर पुन्हा पुन्हा तेच उत्तर सुधारण्यात वेळ घालवतो. एखाद्या विषयात पूर्ण आत्मविश्वास येईपर्यंत पुढील घटक सुरू करत नाही. परिणामी, प्रगतीपेक्षा अपूर्णतेची भावना अधिक वाढते. अभ्यास हा एका दिवसात स्वतःला सिद्ध करण्याचा कार्यक्रम नाही. तो अनेक दिवसांच्या प्रयत्नांतून क्षमता विकसित करण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवस समान परिणाम देणार नाही. काही दिवशी अभ्यास उत्कृष्ट होईल, काही दिवशी अपेक्षेपेक्षा कमी; परंतु कमी कामगिरी झालेल्या दिवसाला पुढील दिवसाच्या प्रगतीचा अडथळा बनू देणे ही आणखी एक चूक आहे. आज आपल्या नियोजनाकडे पाहा. ते प्रत्यक्ष वेळ, क्षमता आणि परिस्थितीच्या आधारावर तयार केले आहे की स्वतःकडून प्रत्येक दिवशी आदर्श कामगिरीची अपेक्षा करून? परिपूर्ण दिवसाच्या प्रतीक्षेत अपूर्ण दिवसांची मालिका निर्माण करू नका. उत्कृष्टतेचा ध्यास ठेवा, पण अपूर्णतेतूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित करा. परीक्षेची तयारी परिपूर्ण दिवसांनी नाही, तर अपूर्ण दिवसानंतरही पुन्हा काम सुरू करण्याच्या वृत्तीने मजबूत होते.

Открыть в Telegram
Просмотры150−83%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
1 ч95
5 ч150
  1. Через 1 час95
  2. Через 6 часов150
  3. Всего сейчас150
#4992Фото
Просмотры482−46%к среднему
Пересылки—
Реакции5
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
24 ч457
28 ч482
  1. Через 24 часа457
  2. Всего сейчас482
#4991Текст

माहिती माहीत असणे आणि दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडता येणे यात फरक आहे. माहिती माहीत असणे म्हणजे एखाद्या घटनेची, संकल्पनेची किंवा तथ्याची केवळ ओळख किंवा साठवणूक असणे. अनेकदा आपण वाचन, ऐकणे किंवा अभ्यासातून अनेक गोष्टी लक्षात ठेवतो; पण त्यांचा गाभा पूर्णपणे समजलेला नसतो किंवा त्यांचा संदर्भ स्पष्ट नसतो. याउलट, दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडता येणे म्हणजे विश्लेषणक्षमता, तर्कसंगत विचार आणि निर्णयक्षमता यांचा वापर करणे होय. केवळ माहिती असणे पुरेसे नसते; तर त्या माहितीतील बारकावे ओळखणे, पर्यायांमधील सूक्ष्म फरक तपासणे, चुकीचे किंवा अर्धवट पर्याय बाद करणे आणि प्रश्नाच्या अचूक रोखानुसार योग्य पर्याय निवडणे आवश्यक असते. परीक्षा, स्पर्धात्मक चाचण्या किंवा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवताना हा फरक प्रकर्षाने जाणवतो. माहितीचा साठा हा केवळ कच्चा माल असतो, तर योग्य पर्याय निवडण्याची क्षमता म्हणजे त्या माहितीचा अचूक वापर होय. म्हणूनच, केवळ माहिती गोळा करण्यापेक्षा तिचे आकलन आणि उपयोजन अधिक महत्त्वाचे ठरते. #Mithunspeaks @mithunpawar

Открыть в Telegram
Просмотры619−31%к среднему
Пересылки—
Реакции7
Комментарии—
#4990Текст

वाचलेली माहिती पुन्हा पाहणे आणि माहिती आठविण्याचा प्रयत्न करणे या दोन वेगळ्या अभ्यासप्रक्रिया आहेत. एखादा विषय /टॉपिक पुन्हा वाचताना तो ओळखीचा वाटतो, त्यामुळे आपल्याला तो चांगला लक्षात आहे असा भ्रम निर्माण होतो. मात्र मटेरियल बंद केल्यानंतर त्यातील मुद्दे आठवता येतात का, हे अधिक महत्त्वाचे आहे. परीक्षेत माहिती समोर दिलेली नसते; ती स्वतःच्या स्मरणातून वापरावी लागते. म्हणून केवळ पुनर्वाचन न करता स्मरणशक्तीला सक्रिय करण्याचा सराव करा. मागील दोन तासांत केलेला अभ्यास आठवून पाहणे किंवा वाचलेल्या भागावर Mix PYQ solving म्हणजेच स्मरणशक्तीला सक्रिय करणे होय. Revision म्हणजे पुन्हा तेच वाचणे हा खूप मोठा गैरसमज आहे. #Mithunspeaks @mithunpawar

Открыть в Telegram
Просмотры696−22%к среднему
Пересылки—
Реакции16
Комментарии—
#4988Текст

परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही किती गांभीर्याने अभ्यास करता, यापेक्षा परीक्षा दूर असताना तुम्ही किती गांभीर्याने अभ्यास केला होता, हे तुमच्या निकालात अधिक महत्त्वाचे ठरत असते. परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत प्रत्येकजण गांभीर्याने अभ्यास करतो. कारण आता वेळ संपत आलेली असते, परीक्षेची भीती मनात असते आणि आपण किती मागे आहोत याची जाणीव झालेली असते. पण खरा प्रश्न हा आहे की परीक्षा दूर असताना तुम्ही किती गांभीर्याने अभ्यास केला होता? आज अभ्यास न करण्यासाठी तुमच्याकडे अनेक कारणे असतील. उद्या भरून काढू, विकेंडला जास्त अभ्यास करू, अजून भरपूर वेळ आहे, अशा समजुतीत तुम्ही स्वतःलाच दिलासा देत असाल. पण लक्षात ठेवा, आजचे टाळणे उद्याच्या जबाबदारीत जमा होत असते. परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला नवीन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची धावपळ नको असेल, तर आजपासूनच शिस्तीने कामाला लागावे लागेल. त्या दिवसांत नवीन गोष्टी शिकण्याऐवजी आधी केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवता आला पाहिजे. स्वतःला एक प्रश्न विचारा : परीक्षा उद्या असती तर आज ज्या गांभीर्याने अभ्यास केला असता, त्याच गांभीर्याने आज अभ्यास करत आहात का? तुमचे उत्तरच तुमच्या तयारीची खरी दिशा ठरवेल. #Mithunspeaks

Открыть в Telegram
Просмотры842−6%к среднему
Пересылки—
Реакции15
Комментарии—
#4987Файл
Просмотры782−13%к среднему
Пересылки—
Реакции7
Комментарии—
#4984Текст
Просмотры1 140+27%к среднему
Пересылки—
Реакции8
Комментарии—
#4982Текст

🔴 ऑनलाईन लेक्चर: 22 नोव्हेंबर "जागा 16000 प्लस, जागा 16717" हो, हे अर्थातच खरे आहे. पण MPSC मध्ये सिरीयस नाहीत अशांना यशाची खात्री आहे. मात्र जे लोक मागील एक, दोन, तीन किंवा चार-पाच वर्षांपासून तयारी करत आहेत त्या लोकांना इतक्या जागा असूनही फायनल पोस्ट मिळेलच अशी अजिबात शाश्वती नाही. मी हे असेच हवेत बोलत नाही. प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला विचारावे. उत्तर हेच मिळेल. मग असे का? त्याची काही कारणे आहेत का? असतील तर ती कोणती? त्याच्यावर उपाय आहे का? असे नानाविध प्रश्न. एकूणच स्पर्धा परीक्षेत अभ्यास करूनही अपेक्षित गुण न मिळण्याची संभाव्य कारणे आणि त्यावर आगामी गट क पूर्व परीक्षेसाठी अशा चुका टाळण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे यासंबंधीचे लेक्चर दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता ऑनलाईन माध्यमातून होईल. ❇️ लेक्चर बाबत: दिनांक: 22 नोव्हेंबर, 2026 वेळ: सायं. 4.30 ते 6 ( वेळ थोडी वाढू शकते मात्र कमी होणार नाही. ) माध्यम: लाइव्ह ऑनलाईन गुगल मीट ( रेकॉर्डिंग नसेल. ) Fees: Rs 50 ( Non Refundable) ( कोणत्याही कारणाने विद्यार्थी लेक्चर करू शकला नाही तर fees परत मिळणार नाही. ) विषय: "अभ्यास करणे आणि परीक्षेत गुण मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत." प्रवेश: जे इच्छुक असतील त्यांनी Whatsapp किंवा telegram यापैकी एकाच ठिकाणी ' 22 नोव्हेंबर Lecture साठी इच्छुक आहे ' असा msg द्यायचा आहे. याबरोबर नाव, पदवी कोणती, पदवी वर्ष आणि लेक्चर मधून काही अपेक्षा असल्यास ते कळवा. त्यावर फी भरा असा रिप्लाय आल्या नंतरच फी भरणे. परस्पर फी भरायची नाही. याबाबत कोणीही फोन करायचे नाहीत. प्रवेश मिळणार नाही. संपर्क: WhatsApp: 9970841952 Telegram: @projectchhaya आगामी 24 जानेवारी साठी तुमच्या मनातील सर्व शंका, अडचणी तसेच तुमच्या अभ्यासात आजवर तसेच चालत आलेले मूलभूत दोष या लेक्चर मधून नक्कीच दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. ज्यायोगे उरलेले दिवस निश्चितच सत्कारणी लागतील.

Открыть в Telegram
Просмотры946+6%к среднему
Пересылки—
Реакции7
Комментарии—
#4981Текст

Переслано из CHHAYA CLUB Nov 26

# DAY 5 | सत्य आपल्या बाजूने नसले, तरी ते स्वीकारण्याची तयारी आहे का? प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल एक विशिष्ट प्रतिमा जपायची असते. आपण प्रामाणिक आहोत, मेहनती आहोत, समजूतदार आहोत आणि आपले निर्णय योग्यच असतात, असे आपल्याला वाटत असते. ही प्रतिमा जपण्याच्या नादात आपण अनेकदा स्वतःमधील त्रुटींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कधी आपण अपयशाचे कारण परिस्थितीला ठरवतो, कधी इतरांच्या चुका मोठ्या करून दाखवतो, तर कधी स्वतःच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी नवनवीन कारणे शोधतो. हळूहळू आपण स्वतःलाच पटवून देतो की आपल्याकडून काही विशेष चूक झालेली नाही. पण एक प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारा : मला खरोखर सत्य जाणून घ्यायचे आहे की मला फक्त माझे म्हणणे बरोबर सिद्ध करायचे आहे? तत्त्वज्ञ सोक्रेटिस यांचा विचार होता की, परीक्षण न केलेले जीवन जगण्यास योग्य नाही. त्यांच्या विचाराचा गाभा असा की, माणसाने स्वतःच्या विचारांची, श्रद्धांची आणि कृतींची सतत चिकित्सा केली पाहिजे. MPSC च्या तयारीत याचा अर्थ केवळ चाचणीतील गुण तपासणे एवढाच नाही. आपण अभ्यास टाळतो आहोत का? अपयशानंतर कारणे शोधण्याऐवजी स्वतःच्या त्रुटी तपासतो आहोत का? आपल्याला जे सोयीचे वाटते तेच योग्य मानतो आहोत का? या प्रश्नांची उत्तरे स्वतःशी प्रामाणिक राहून शोधावी लागतात. स्वतःची चूक मान्य करणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे. उलट, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची ती पहिली अट आहे. जगाला तुमच्या चुका दिसल्या नाहीत तरी चालेल; पण स्वतःपासून त्या लपवू नका. कारण स्वतःची फसवणूक करणारा माणूस स्वतःची प्रगती कधीच करू शकत नाही. JOIN: @mithunpawar

Открыть в Telegram
Просмотры8990%к среднему
Пересылки—
Реакции13
Комментарии—
#4979Текст

🔴 स्वतःला जाणीवपूर्वक मर्यादित ठेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. तुम्ही परीक्षार्थी म्हणून उभे असताना तुमची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी अभ्यास हीच आहे. कुटुंबातील कामात सहभागी होणे, प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे किंवा प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देणे , काळजी वाहत बसणे याला त्या काळात मर्यादा घालता आल्या पाहिजेत. कारण तुमच्या अनुपस्थितीची तक्रार करणारे अनेकजण असतील; पण अपयश आले तर त्याची जबाबदारी तुमच्याच माथी मारली जाईल. तुम्ही किती वर्षे तयारी केली, किती संधी वाया घालवल्या, याचा हिशेब मात्र सगळे ठेवतील. म्हणून काही काळ स्वतःला जाणीवपूर्वक मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी उपलब्ध असणे म्हणजे कुटुंबाप्रती प्रेम नव्हे आणि प्रत्येक गोष्टीला नकार देणे म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. आपल्या ध्येयासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे धैर्यही असावे लागते. आयुष्यातील काही वर्षे स्वतःच्या भविष्यासाठी राखून ठेवता आली नाहीत, तर नंतर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करूनही स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांचे ओझे वाहावे लागेल. आज थोडेसे अप्रिय होण्याची तयारी ठेवा; उद्या स्वतःच्या अपयशाचे समर्थन करण्याची वेळ येऊ देऊ नका. ( CHHAYA CLUB मधील एक प्रश्न ) #Mithunspeaks @mithunpawar

Открыть в Telegram
Просмотры1 340+49%к среднему
Пересылки—
Реакции35
Комментарии—
#4978Текст

🟧 सरकारी नोकरी ❌ Job Satisfication येथे job satisfaction अपेक्षा ठेवू नका. ही व्यवस्था नियम, जीआर, फाईल्स आणि मर्यादित स्वायत्ततेच्या चौकटीत चालते. इथे चाकोरीबाहेर जाऊन काम करण्यास, त्वरित बदल घडवण्यास किंवा वैयक्तिक कर्तृत्वाचे कौतुक होण्यास फारसा वाव नसतो. राजकीय हस्तक्षेप, बदल्यांचे चक्र आणि एकसुरी कामामुळे मनासारखा ठसा उमटवणे अनेकदा कठीण होते. त्यामुळे या नोकरीकडे कामातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाचे साधन म्हणून पाहू नका. तिचे खरे मूल्य सुरक्षितता, स्थिर उत्पन्न आणि सामाजिक प्रतिष्ठेत आहे. अपेक्षांना वास्तवाच्या मर्यादेत ठेवले तरच अनावश्यक नैराश्य टळते; समाधान हवे असेल, तर ते नोकरीबाहेरच्या आयुष्यातून शोधणे अधिक शहाणपणाचे ठरते. ( CHHAYA CLUB मधील एक प्रश्न ) #Mithunspeaks

Открыть в Telegram
Просмотры1 240+38%к среднему
Пересылки—
Реакции43
Комментарии—
#4977Текст

Переслано из CHHAYA CLUB Nov 26

"To be wronged is nothing unless you continue to remember it." — Confucius "मनावर घेतलेला अन्याय किंवा अपमान आपण किती काळ कुरवाळत बसतो, त्यावरूनच आपला मोठेपणा ठरतो; तो सोडून देणं हाच खरा दिलदारपणा." कन्फ्यूशियसचा हा विचार मानवी मनाच्या सूक्ष्म पैलूंवर अचूक बोट ठेवतो. आयुष्यात कोणाकडून तरी दुखावलं जाणं, अपमानित होणं किंवा अन्याय सहन करावा लागणं हे आपल्या हातात नसतं; पण तो प्रसंग मनात किती काळ जिवंत ठेवायचा, हा पूर्णपणे आपला निर्णय असतो. आपण जेव्हा जुन्या जखमा पुन्हा पुन्हा उघडतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच अधिक कडकडीत शिक्षा भोगत असतो. राग, सूडाची भावना आणि अपमानाची स्मृती मनात साठवून ठेवणं म्हणजे स्वतःच्याच शांतीवर रोज विष शिंपडण्यासारखं आहे. ती आठवण जितकी ताजी राहील, तितकं आपलं वर्तमान अंधारमय होत जातं. खरा मोठेपणा बदला घेण्यात नाही, तर त्या कटू आठवणीचा ताबा सोडून देण्यात आहे. माफी करणं म्हणजे समोरच्याची चूक मान्य करणं नव्हे, तर स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणं होय. जेव्हा आपण भूतकाळातील तो अपमान विसरून पुढे जातो, तेव्हाच मन हलकं होतं आणि शांततेचा नवा मार्ग खुला होतो. अखेरीस, कोणी आपल्याशी कसं वागलं यापेक्षा, आपण त्या आठवणीला आपल्या मनात किती जागा दिली, यावरच आपलं खरं अस्तित्व आणि शांतता अवलंबून असते. #Mithunspeaks @mithunpawar

Открыть в Telegram
Просмотры1 080+20%к среднему
Пересылки—
Реакции8
Комментарии—
#4976Текст

Переслано из CHHAYA CLUB Nov 26

# DAY 3 | भावनेच्या भरात घेतलेला निर्णय किती महागात पडू शकतो? माणूस निर्णय घेताना स्वतःला तर्कशुद्ध समजतो; परंतु प्रत्यक्षात अनेक निर्णय भीती, राग, निराशा, उत्साह किंवा असुरक्षिततेच्या प्रभावाखाली घेतले जातात. विशेष म्हणजे, अशा वेळी आपण घेतलेला निर्णय आपल्याला अगदी योग्य वाटत असतो. कारण त्या क्षणी भावना आपल्या विचारप्रक्रियेवर वर्चस्व गाजवत असतात. समजा, एखाद्या चाचणीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. निराशेच्या भरात एखादा विद्यार्थी संपूर्ण अभ्यासपद्धती बदलतो, नवीन पुस्तके विकत घेतो किंवा आपण या परीक्षेसाठी योग्यच नाही, असा निष्कर्ष काढतो. दुसरीकडे, एखाद्या चाचणीत चांगले गुण मिळाले की स्वतःची तयारी पूर्ण झाली, असा अतिआत्मविश्वास निर्माण होतो. दोन्ही निर्णय वस्तुनिष्ठ विश्लेषणाऐवजी तात्कालिक भावनेतून आलेले असतात. डॅनियल काह्नमन यांनी *Thinking, Fast and Slow* मध्ये मानवी निर्णयप्रक्रियेतील दोन विचारपद्धती स्पष्ट केल्या आहेत. एक वेगवान, सहज आणि भावनांवर प्रभावीपणे चालणारी; तर दुसरी संथ, विचारपूर्वक आणि विश्लेषणात्मक. प्रत्येक परिस्थितीत पहिली पद्धत चुकीची नसते; परंतु महत्त्वाचे निर्णय घेताना दुसऱ्या पद्धतीची गरज असते. भावनांना दाबणे हा आत्मसंयम नाही. भावना जाणवूनही त्यांना आपल्या निर्णयांचा एकमेव आधार न बनू देणे, हा खरा आत्मसंयम आहे. पुढच्या वेळी मन अस्वस्थ असताना एखादा मोठा निर्णय घ्यावासा वाटला, तर स्वतःला थोडा अवकाश द्या. परिस्थितीचे तथ्य, उपलब्ध पर्याय आणि प्रत्येक पर्यायाचे संभाव्य परिणाम तपासा. भावना तुम्हाला परिस्थितीची जाणीव करून देतात; पण त्या प्रत्येक वेळी योग्य दिशा दाखवतीलच असे नाही. निर्णय घेताना मनाचे ऐका, पण विवेकाचा अधिकार त्याच्याकडेच सोपवू नका.

Открыть в Telegram
Просмотры1 030+15%к среднему
Пересылки—
Реакции3
Комментарии—
#4974Текст

Переслано из CHHAYA CLUB Nov 26

🔴 झीरोतून अभ्यास? स्पर्धा परीक्षा दर वर्षी येतात. नेहमी कट ऑफ पासून आपण दूरच राहतो. आता निमित्त 16717 चे. मग आपण दर वर्षी झीरोतून अभ्यास सुरू करतो. का? चांगले व्हावे म्हणून. Perfect व्हावे म्हणून. कसलेही self analysis न करता आपला हा नेहमीच ठरलेला कार्यक्रम असतो. बाजारातील उपक्रम पण याच पद्धती अवलंबत असतात. पुन्हा पुन्हा तशाच बॅचेस. मग तेच मॉडेल नकळत आपल्याही अंगवळणी पडते. आपली गरज, आवश्यकता काय? याचा कोणीच विचार करत नाही. वास्तविक एक दोन वर्षे अभ्यास केल्या नंतर झीरो तून अभ्यास करण्यापेक्षा आपल्या चुका शोधून केवळ तिथेच ताकद लावायला हवी. असे का? परीक्षेत अपयश बहुतांश वेळा संकल्पनांच्या अभावामुळे नव्हे, तर प्रश्न समजण्यात गैरसमज आणि सिली मिस्टेक मुळे येते. प्रत्येक वेळी सर्व अभ्यास नव्याने वाचत बसल्यास वेळेचा अपव्यय होतो आणि जुन्या चुका तशाच राहतात. यावर उपाय म्हणून, रोज PYQ solving मधून, टेस्ट्सच्या विश्लेषणातून आपल्या कमकुवत बाजू (Weak Areas) शोधा. ज्या घटकांचे गुण जात आहेत, तिथेच रिव्हिजनची ताकद लावा. किंवा आवश्यक ते उपाय अवलंबवा. तसेच वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यावर भर द्या. मूळचा अभ्यास झालेला असल्याने, पुन्हा शून्यापासून सुरुवात करणे म्हणजे मोठाच भ्रम आहे. तसे न करता केवळ उणिवा दूर करत करत जेव्हा त्या minimum of minimum होतील तेव्हा तुम्ही कट ऑफ लाइन नक्कीच पार केलेली असेल. मग ती प्री असो वा मुख्य! आता निमित्त 16717! #Mithunspeaks @mithunpawar

Открыть в Telegram
Просмотры935+4%к среднему
Пересылки—
Реакции11
Комментарии—
#4973Текст

या महिन्यात CHHAYA CLUB मध्ये काय असेल? 👇👇 🔴 आता पुढे काय? पुढील ३० दिवसांत आपण केवळ अभ्यास, शिस्त आणि सातत्य यांवर बोलणार नाही, तर स्वतःचे नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले विचार कसे घडतात, निर्णय घेताना आपण कुठे चुकतो, भावनांचा आपल्या कृतींवर कसा प्रभाव पडतो, टीका आणि अपयशाकडे कसे पाहावे, योग्य-अयोग्य यातील फरक कसा ओळखावा आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपली मूल्ये कशी जपावीत, अशा विविध पैलूंवर चर्चा होईल. मार्कस ऑरेलियस, अरिस्टॉटल, व्हिक्टर फ्रँकल, डॅनियल काह्नमन आणि नेल्सन मंडेला यांसारख्या विचारवंतांच्या जीवनदृष्टीचा आणि तत्त्वज्ञानाचा आधार घेतला जाईल. प्रत्येक दिवसाचा संदेश तुम्हाला केवळ प्रेरणा देणार नाही, तर स्वतःच्या विचारांची, निर्णयांची आणि वर्तनाची चिकित्सा करायला भाग पाडेल. उद्दिष्ट केवळ यशस्वी उमेदवार घडवणे नाही; तर विवेकी, आत्मनिर्भर, जबाबदार आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाचे अधिकारी घडवण्याच्या दिशेने वाटचाल करणे आहे. अधिक माहिती साठी: https://t.me/mithunpawar/4971

Открыть в Telegram
Просмотры1 010+13%к среднему
Пересылки—
Реакции12
Комментарии—