पेपर फुटी प्रकरण....काही ज्ञानी पंडित सांगत होती..मेरिट high जाण्याचे कारण मुलांचा अभ्यास आहे.. अरे भाऊ पैसा आहे पैसा. गंधा आहे पण धंदा आहे.😂😂
Открыть в TelegramПосты канала GDC IAS ACADEMY (Official)™
Flying Lizard म्हणजे उडणारा सरडा. याचे शास्त्रीय नाव Draco volans आहे. हा सरडा प्रत्यक्ष पक्ष्यांप्रमाणे उडत नाही, तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हवेत घसरत (Gliding) जातो. शरीराच्या दोन्ही बाजूंना त्वचेचे पंखासारखे पडदे असतात. या पडद्यांना Patagium (पॅटॅजियम) म्हणतात. हे पडदे लांब झालेल्या बरगड्यांच्या आधाराने पसरतात. झाडावरून उडी मारल्यानंतर हे पडदे पसरवून हवेत घसरतो. लांब शेपटीमुळे दिशा नियंत्रित करण्यास मदत होते. इतर काही प्रकार🙏 • (1) कॅमेलिऑन (Chameleon): याला मराठीत 'सरडा' (विशेषतः रंग बदलणारा सरडा) म्हणतात. हा आपल्या सभोवतालच्या वातावरणानुसार शरीराचा रंग बदलण्यासाठी ओळखला जातो. • (2) कॅलोटस (Calotes): हा आपल्या परिसरात सामान्यपणे आढळणारा 'बागेतील सरडा' (Garden Lizard) आहे, ज्याला मराठीत 'रक्तचंदन' किंवा 'किरडा' असेही म्हणतात. • (3) हेमिडॅक्टायलस (Hemidactylus): याला सामान्य भाषेत 'घरातील पाल' (House Gecko) 🙏🙏🙏🙏
Открыть в Telegram👍रामानुजन पुरस्कार 2026 (Ramanujan Prize), विजेते: प्रा. महेश काकडे (Mahesh Kakde) देश: भारत 🇮🇳 संस्था: भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू क्षेत्र: बीजगणितीय संख्या सिद्धांत (Algebraic Number Theory) पुरस्कार जाहीर: 30 सप्टेंबर 2026. पुरस्काराविषयी महत्त्वाचे मुद्दे सुरुवात – 2005. पुरस्कार दरवर्षी दिला जातो. संयुक्तपणे देणाऱ्या संस्था: ICTP – International Centre for Theoretical Physics. IMU – International Mathematical Union. पात्रता – विकसनशील देशातील 45 वर्षांपेक्षा कमी वयाचा गणितज्ञ. पुरस्काराची रक्कम – 10,000 अमेरिकी डॉलर.
Открыть в Telegramआधुनिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील काँग्रेसपूर्व काळातील महत्त्वाच्या राजकीय संघटनांची थोडक्यात आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती खालीलप्रमाणे आहे: १. लँडहोल्डर्स सोसायटी (Landholders' Society) – १८३८ संस्थापक: द्वारकानाथ टागोर (कलकत्ता). उद्देश: बंगाल, बिहार आणि ओरिसामधील जमीनदारांच्या हिताचे रक्षण करणे. ही भारतातील पहिली संघटित राजकीय संस्था मानली जाते. २. ब्रिटिश इंडियन असोसिएशन (British Indian Association) – १८५१ संस्थापक: राधाकांत देव आणि देवेंद्रनाथ टागोर (कलकत्ता). कार्य: १८५३ च्या चार्टर ॲक्टपूर्वी ब्रिटिश पार्लमेंटकडे भारतीयांच्या मागण्यांचे निवेदन पाठवणे आणि प्रशासनात भारतीयांना स्थान मिळवून देणे. ३. मद्रास नेटिव्ह असोसिएशन (Madras Native Association) – १८५२ संस्थापक: गजुलू लक्ष्मीनरसू चेट्टी (मद्रास). कार्य: मद्रास प्रांतातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, जुलमी करपद्धती आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवायांविरुद्ध आवाज उठवणे. ४. इंडियन असोसिएशन (Indian Association) – १८७६ संस्थापक: सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस (कलकत्ता). कार्य: नागरी सेवा परीक्षेची (ICS) वयोमर्यादा कमी करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या निर्णयाविरुद्ध देशव्यापी आंदोलन उभारणे. काँग्रेस स्थापनेपूर्वीची ही सर्वात प्रभावी राष्ट्रीय संघटना होती. ५. मद्रास महाजन सभा (Madras Mahajan Sabha) – १८८४ संस्थापक: एम. वीरराघवाचारी, जी. सुब्रमण्यम अय्यर आणि पी. आनंदचारलू (मद्रास). कार्य: मद्रास प्रांतातील स्थानिक संघटनांच्या कार्यात समन्वय साधणे आणि शेतकऱ्यांच्या समस्या व कायदेमंडळातील सुधारणांची मागणी करणे. ६. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन (Bombay Presidency Association) – १८८५ संस्थापक: फिरोजशहा मेहता, के. टी. तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी (मुंबई). कार्य: लॉर्ड लिटनच्या प्रतिगामी धोरणांना आणि इल्बर्ट बिलावरील वादातून निर्माण झालेल्या अन्यायाला विरोध करणे.
Открыть в Telegram१. ना. म. जोशी यांनी स्थापन केलेल्या प्रमुख संस्था सोशल सर्व्हिस लीग (१९११): कामगार आणि वंचित घटकांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी मुंबईत या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत कामगारांसाठी रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय मदत केंद्रे आणि आपत्कालीन साहाय्य दिले जात असे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस - AITUC (१९२०): कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय स्तरावर लढा देण्यासाठी लाला लजपत राय, जोसेफ बॅप्टिस्टा आणि दिवाण चमनलाल यांच्या सहकार्याने ३१ ऑक्टोबर १९२० रोजी मुंबईत ही संघटना स्थापन केली. ना. म. जोशी या संघटनेचे पहिले सरचिटणीस (General Secretary) होते. सहकारी मनोरंजन मंडळ (१९२२): मुंबईतील गिरणी कामगारांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांना सकस मनोरंजन व सांस्कृतिक शिक्षण देण्यासाठी परळ येथे ही नाट्यसंस्था सुरू केली. इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन - ITUF (१९२९): १९२९ मध्ये AITUC मध्ये वैचारिक मतभेदांमुळे फूट पडल्यानंतर ना. म. जोशी यांनी मवाळ विचारांच्या कामगार संघटनांना एकत्र आणून या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली.
Открыть в Telegramमोबाईलच्या हट्टापायी स्वतःच्या जन्मदात्या बापाचा जीव घेण्याइतकी माणुसकी कुठे हरवली? 😡 ज्या बापाने स्वतःच्या घामाचं पाणी करून लेकरांचं आयुष्य घडवलं, त्याच बापाचा जीव घेण्यापूर्वी हात थरथरले नाहीत का? मोबाईल पुन्हा मिळू शकतो, पैसा पुन्हा कमावता येतो; पण बापाचं छत्र आयुष्यात पुन्हा कधीच मिळत नाही! अशा विकृत मानसिकतेला काय म्हणावं? 🥺💔
Открыть в Telegramएका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा आपल्या वृद्ध वडिलांची काळजी घेतानाचा फोटो कौटुंबिक जबाबदारीच्या संदेशामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये त्यांची ओळख डॉ. संदीप मित्तल, एक IPS अधिकारी अशी करून देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसोबतच वडिलांची काळजी घेण्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे. व्यावसायिक पद कितीही मोठे असले, तरी वृद्ध कुटुंबीयांची काळजी घेणे ही प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अर्थपूर्ण पद्धत असू शकते. व्यावसायिक यश आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टी एकत्र निभावता येतात, याची आठवण हा फोटो करून देतो. आई-वडिलांप्रती आदर, सहानुभूती आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे ही मूल्ये प्रत्येक पिढीसाठी महत्त्वाची आहेत.
Открыть в TelegramGet full Fast Track Special Talathi (Combine Group C) Course from GDC ACADEMY for UPSC & MPSC Now. Link - https://gdcacademy.com/new-courses/82
Открыть в Telegram📢 नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका: पवित्र पोर्टलवरून 'शालार्थ आयडी' (Shalarth ID) व Post Creation ची संपूर्ण कार्यपद्धती! 💻👨🏫👩🏫📋 पवित्र पोर्टलद्वारे नव्याने सेवेत रुजू झालेल्या शिक्षण सेवकांचे वेतन वेळेवर सुरू होण्यासाठी शाळास्तरावर HM Login वरून Post Creation आणि Shalarth ID तयार करण्याचे सुधारित टप्पे खालीलप्रमाणे आहेत: 📌 ऑनलाईन प्रक्रियेचे मुख्य टप्पे: १. डेटा नोंदणी: पवित्र प्रणालीतून कर्मचाऱ्याची माहिती पडताळणीनंतर (Validations) 'Add New Employee Record' मध्ये जतन होते. २. रिक्त पद तपासणी व निर्मिती: शालार्थ प्रणालीत DDO कडे रिक्त पद उपलब्ध नसल्यास, संचमान्यतेच्या मंजूर मर्यादेनुसार (Approved Limit) आप आप (Automatically) पद तयार (Post Creation) होते. ३. Shalarth ID जनरेशन: पद उपलब्ध होताच शालार्थ आयडी तयार होऊन DDO लॉगिनला दिसतो; त्यानंतर तो संबंधित बिल ग्रुपला जोडून (Attach) वेतन पथकाकडे बिल पाठवावे. ४. UID Error आल्यास काय करावे? पवित्र पोर्टल व आधार कार्डवरील नावात तफावत असल्यास विवाह प्रमाणपत्र/राजपत्र व हमीपत्रासह मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून पोर्टलवर नाव दुरुस्त करून घ्यावे. ५. पहिल्या वेतनासाठी वेतन पथकाकडे जोडावयाची कागदपत्रे: • सर्वसाधारण गुणवत्ता यादी व संस्था निवड यादी (Selection List) • संस्था नियुक्ती आदेश व शाळास्तरावरील रुजू अहवाल • खाजगी शाळेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी पोर्टलवर अपलोड केलेली NOC 👉 नवनियुक्त शिक्षक बांधव, मुख्याध्यापक आणि लिपिक मित्रांपर्यंत ही अत्यंत उपयुक्त माहिती नक्की शेअर करा! #पवित्रपोर्टल #PavitraPortal #ShalarthID #शालार्थआयडी #नवनियुक्तशिक्षक #ShikshanSevak #MaharashtraTeachers #महत्त्वाची
Открыть в Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Открыть в Telegramभाऊ-बहिणीचे नाते असते प्रेमाचा गोडवा, सुख-दुःखात साथ देणारा विश्वासाचा धागा… या नात्यात सदैव राहो प्रेम आणि आनंद, भाऊबीजेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! 💐
Открыть в Telegram